आलिया भटने रणबीर कपूरचा फोटो क्रोप करत पोस्ट केला फोटो, पण नेटिझन्सने अखेर त्याला ओळखलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 17:20 IST2020-12-31T17:19:12+5:302020-12-31T17:20:29+5:30
आलियाच्या या फोटोत आपल्याला बाजूला एक मुलगा बसलेला दिसत असून या मुलाला फोटो पोस्ट करताना आलियाने क्रॉप केले आहे. हा मुलगा दुसरा कोणीही नसून रणबीर कपूर आहे.

आलिया भटने रणबीर कपूरचा फोटो क्रोप करत पोस्ट केला फोटो, पण नेटिझन्सने अखेर त्याला ओळखलेच
आलिया भट सध्या राजस्थान येथील रणथंबोर येथे तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. तिने या व्हेकेशनचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण या फोटोमुळे एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. तिच्या या फोटोत आपल्याला बाजूला एक मुलगा बसलेला दिसत असून या मुलाला फोटो पोस्ट करताना आलियाने क्रॉप केले आहे. हा मुलगा दुसरा कोणीही नसून रणबीर कपूर आहे.
आलियाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फोटोलो अनेक कमेंट मिळत आहेत. आलियाने या फोटोत थंडीत घालण्यात येणारे कपडे घातले असून या ओव्हरकोटमध्ये ती खूपच छान दिसत आहे. तिची स्तुती करायची सोडून नेटिझन्स रणबीरबाबतच कमेंट देत आहेत. एकाने तिच्या बाजूला आरके बसला आहे असे लिहिले आहे तर एकाने तू रणबीरला क्रॉप का केलेस असे विचारले आहे. आम्ही रणबीरला या फोटोत पाहू शकतोय अशी देखील कमेंट या फोटोखाली लिहिण्यात आली आहे.
रणबीर, आलिया शिवाय नीतू कपूर, रणबीरची बहीण रिद्धिमा, मित्र अयान मुखर्जी इतकेच नाही तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग असे सगळेच एकाच वेळी राजस्थानातील रणथंबोर येथे पोहोचले आहेत. त्यामुळे आलिया-रणबीर रणथंबोरला गुपचूप साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण यावर रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी खुलासा केला आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना रणधीर कपूर यांनी आलिया-रणबीरच्या साखरपुड्याची बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. ‘असे काहीही नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही. रणबीर आणि आलियाचा साखरपुडा होणार असता तर मी आणि आमच्या कुटुंबातील अन्य लोक त्यांच्यासोबत असते ना? रणबीर, आलिया आणि नीतू तिथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेले आहेत. याशिवाय काहीही नाही. ’