'३ इडियट्स', 'लाल सिंग चढ्ढा' या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मोना सिंग. मोनाने टीव्ही इंडस्ट्रीतही स्वतःचं नाव कमावलं आहे. मोनाने गेल्या काही वर्षांमध्ये वजन कमी करुन आणि फिट अँड फाईन राहून सर्वांना थक्क करुन सोडलंय. मोनाने ६ महिन्यात तब्बल १५ वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे यासाठी तिने जीम वगैरे काही लावलं नाही. घरबसल्या मोना सिंगने वजन कमी करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. काय आहे मोनाच्या वेट लॉसचं सीक्रेट?मोना सिंगने वजन कसं कमी केलं?
एका मुलाखतीत मोनाने तिची वेट लॉस जर्नी सर्वांना सांगितली. मोना म्हणाली, वजन कमी करण्यासाठी मला जीम नाही तर योगासनांची मदत मिळाली. मी रोज योगासनं करते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीचं पालन करायला हवं. वजन कमी करणं हे सोपं काम नाही. याशिवाय इंटरमिटेंट फास्टिंगमुळेही वजन कमी होण्यास मदत होते, असा खुलासा मोनाने केलाय. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही दिवसातून एका ठराविक वेळेत खाता आणि उरलेले तास उपवास करता.
'ती' गोष्ट मोनाने टाळली
वजन कमी करण्यासाठी मोनाने तिच्या आहारावर विशेष लक्ष केंद्रित केलं. मोनाच्या खाण्यात पोषक तत्वांचा समावेश असायचा. त्यामुळे दिवसातून एकदा जरी खाल्लं तरी मोनाला भूक लागायची नाही. याशिवाय शरीरीमध्ये अतिरिक्त चरबी वाढायची नाही. वजन कमी करण्यासाठी मोनाने फक्त घरी बनवलेल्या जेवणाला प्रधान्य दिलं. बाहेरचं खाणं तिने पूर्णपणे टाळलं. त्यामुळेच स्वतःवर आणि स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास, तुम्हीही तुमचं वजन कमी करु शकता, असा सल्ला मोनाने सर्वांना दिला.