नवाजसोबतच्या बोल्ड सीनला चित्रांगदाची ना?

By Admin | Updated: June 16, 2016 03:42 IST2016-06-16T03:42:25+5:302016-06-16T03:42:25+5:30

चित्रांगदा सिंह गेल्या पाच वर्षांपासून कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. पाच वर्षांपूर्वी ‘देसी बॉयज’मध्ये ती अखेरची दिसली होती. गेल्यावर्षी ‘गब्बर इज बॅक’मध्ये ती केवळ एक आयटम साँग करताना

Bold scene with Nawazuddin Chitrangada? | नवाजसोबतच्या बोल्ड सीनला चित्रांगदाची ना?

नवाजसोबतच्या बोल्ड सीनला चित्रांगदाची ना?

चित्रांगदा सिंह गेल्या पाच वर्षांपासून कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. पाच वर्षांपूर्वी ‘देसी बॉयज’मध्ये ती अखेरची दिसली होती. गेल्यावर्षी ‘गब्बर इज बॅक’मध्ये ती केवळ एक आयटम साँग करताना दिसली. अशातच ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातून चित्रांगदा कमबॅक करणार, अशी खबर आली. या बातमीने चित्रांगदाचे चाहते खूश झालेत. गत आठवड्यात शूटिंगही सुरू झाले...पण शूटिंगनंतर तीनच दिवसांत चित्रांगदाने हा चित्रपट सोडला. दिग्दर्शक कुषाण नंदी व निर्मात किरण श्रॉफसोबत चित्रांगदाचे इतके वाजले की, चित्रांगदाने बॅग पॅक केली आणि ती तडक लखनौवरून मुंबईला परतली. ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ मध्ये नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. ही एका कॉन्ट्रेक्ट किलरची कथा आहे. यात चित्रांगदा गावातील एक गरिब तरुणी बनणार होती. ती या कॉन्ट्रेक्ट किलरवर भाळते आणि त्यांचे प्रेम बहरते, असे एक वळणही चित्रपटात होते. या वळणावर नवाजुद्दीन व चित्रांगदा यांच्या काही बोल्ड सीन द्यायचे होते. इथूनच वाद सुरू झाला.

Web Title: Bold scene with Nawazuddin Chitrangada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.