मोठ्या हीरोइन्सचे छोटे हीरो
By Admin | Updated: August 17, 2015 00:07 IST2015-08-17T00:07:15+5:302015-08-17T00:07:15+5:30
बॉलीवूडमध्ये बरेचसे अभिनेते पन्नाशीकडे झुकलेले आहेत, मात्र त्यांच्या निम्म्याहून कमी वय असलेल्या अभिनेत्रींसोबत ते काम करीत आहेत. त्यामुळे अभिनेत्रींनीदेखील

मोठ्या हीरोइन्सचे छोटे हीरो
बॉलीवूडमध्ये बरेचसे अभिनेते पन्नाशीकडे झुकलेले आहेत, मात्र त्यांच्या निम्म्याहून कमी वय असलेल्या अभिनेत्रींसोबत ते काम करीत आहेत. त्यामुळे अभिनेत्रींनीदेखील आपल्यापेक्षा युवा असणाऱ्या अभिनेत्यासोबत काम केले तर आश्चर्य वाटण्याजोगे नसावे. एक नजर अशाच चित्रपटांविषयी...
कॅटरिना कैफ - सिद्धार्थ मल्होत्रा
कॅटरिना अ श्रेणीतल्या युवा अभिनेत्यांसोबत रोमँटिक चित्रपट करीत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हा कॅटरिनासोबत नाव जाहीर न झालेल्या रोमँटिक चित्रपटात काम करीत आहे. कॅटरिना कैफ (वय ३३) ही सिद्धार्थ मल्होत्रा (वय ३०) याच्यासोबत नित्या मेहराच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या लव्ह स्टोरीमध्ये काम करते आहे. नित्या हा फरहान अख्तरचा माजी साहाय्यक आहे. नामवंत अभिनेत्रीसोबत काम करताना कसे वाटते, यावर सिद म्हणाला की मी विद्यार्थी असल्यापासून कॅटरिनाचे चित्रपट पाहतो. बुमद्वारे कॅटने आगमन केले. त्यावेळी मी १८ वर्षांचा होतो. मोठ्या पडद्यावर मी अगदीच बालीश वाटणार नाही याची काळजी घेत असल्याचे सिदने स्पष्ट केले.
करिना कपूर - अर्जुन कपूर
करिना कपूर (३४) ही अर्जुन कपूर (३०) सोबत आर. बल्कीच्या येणाऱ्या ‘की अँड का’ या चित्रपटात काम करीत आहे. हे दोघे विवाहित जोडप्यांची भूमिका निभावत आहेत. बेबोने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘रिफ्युजी (२०००) या चित्रपटाने केली होती़ अर्जुन कपूर त्यावेळी १५ वर्षांचा होता. लहानपणी मला बेबो खूप आवडायची, असे अर्जुन म्हणतो.
करिना कपूरने इम्रान खानसोबत दोन चित्रपट केले आहेत. एक मैं और एक तू (२०१२) आणि गोरी तेरे प्यार में (२०१३). बेबोने १५ वर्षांपूर्वी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी इम्रान हा केवळ १७ वर्षांचा होता. त्यानंतर इम्रानने ‘जाने तू.. या जाने ना.. (२००८) या चित्रटाद्वारे व्यवसायात उडी घेतली.
राणी मुखर्जी - शाहीद कपूर
राणी मुखर्जी (३७) हिने शाहीद कपूरसोबत (३४) ‘दिल बोले हडिप्पा’ (२००९) आणि पृथ्वीराज (३२) सोबत ‘अय्या’ (२०१३) हा चित्रपट केला. लग्नापूर्वी करिअर योग्य वळणावर यावे म्हणून तिने हे चित्रपट केले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफीसवर साफ आपटले.
कोंकणा सेन - रणबीर कपूर
कोंकणा सेन शर्मा (३५) आणि रणबीर कपूर (३२) यांनी ‘वेक अप सिद’ (२००९) हा चित्रपट केला. वय झालेली महिला आणि कॉलेजचा मुलगा यांच्यातील संबंधांचा हा चित्रपट होता. त्यामुळे फारसा फरक पडला नाही.