अक्षय बनणार बिग बॉसचा होस्ट?
By Admin | Updated: July 20, 2014 00:19 IST2014-07-20T00:19:17+5:302014-07-20T00:19:17+5:30
बिगबॉसच्या सातव्या सिजनदरम्यानच सलमानने पुन्हा हा शो होस्ट करणार नसल्याचे संकेत दिले होते.

अक्षय बनणार बिग बॉसचा होस्ट?
बिगबॉसच्या सातव्या सिजनदरम्यानच सलमानने पुन्हा हा शो होस्ट करणार नसल्याचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याच्याऐवजी शाहरुख जास्त चांगला होस्ट असल्याचे म्हटले होते. शाहरुखला या शोची ऑफरही आली होती; पण बिजी शेडय़ूलमुळे तो ही ऑफर स्वीकारणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ही ऑफर रणबीर कपूरला देण्यात आली; पण एवढय़ात टीव्हीवर येण्याचा विचार नसल्याने रणबीरनेही ही ऑफर नाकारली. आता अक्षय कुमार या शोचा होस्ट बनणार असल्याची बातमी आहे. अक्षयने यापूर्वी खतरो के खिलाडीसारखा रिअॅलिटी शो होस्ट केला आहे. बिग बॉसचे सातवे सिजन होस्ट करण्यासाठी अक्षयला तगडी फी ऑफर करण्यात आली आहे. अक्षय आता ही ऑफर स्वीकारतो की नाही, हे लवकरच कळेल.