उत्तम कथा, अभिनयाचा आविष्कार
By Admin | Updated: June 6, 2014 23:17 IST2014-06-06T23:17:27+5:302014-06-06T23:17:27+5:30
बॉलिवूडमध्ये चित्रपटसृष्टीची ओळख करून देणारे अनेक चित्रपट बनले आहेत. तसेच भारत-पाकिस्तान संबंधांबाबतच्या चित्रपटांबाबतीतही सांगता येईल.

उत्तम कथा, अभिनयाचा आविष्कार
>बॉलिवूडमध्ये चित्रपटसृष्टीची ओळख करून देणारे अनेक चित्रपट बनले आहेत. तसेच भारत-पाकिस्तान संबंधांबाबतच्या चित्रपटांबाबतीतही सांगता येईल. पण या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडत दिग्दर्शक नितीन कक्कड यांनी ‘फिल्मीस्तान’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. अशा पद्धतीने बनवलेला हा चित्रपट खूपच रोमांचक आणि पैसे वसूल करणारा मनोरंजनपट आहे.
दिल्लीस्थित पंजाबी कुटुंबातला मुलगा सनी (शारिब हाश्मी) बॉलिवूडमध्ये स्टार बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येतो. त्याचे प्रयत्न फक्त ऑडिशन्सपुरतेच मर्यादित राहतात. पण असे असूनही या क्षेत्रत काम करण्याचे त्याचे स्वप्न मात्र मोठे आहे. या संघर्षाच्या काळात त्याचा विश्वासही ढळत नाही. त्याचे प्रयत्न सुरूच असतात. अभिनयाच्या क्षेत्रत त्याला फारसे यश मिळत नाही. दरम्यान, राजस्थानवर अमेरिकन पत्रकारांची टीम डॉक्युमेंट्री बनवणार असते. त्यांना साहाय्य करण्याचे काम त्याला मिळते. राजस्थान जवळून जाणा:या पाकिस्तान सीमेनजीक हे चित्रीकरण चालू असते. त्या वेळी एका मध्यरात्री सनीचे अपहरण होते. दुस:या दिवशी त्याला आपण पाकिस्तानात आहोत असे लक्षात येते. अमेरिकन पत्रकारांचे अपहरण करून आपल्या लोकांची सुटका करायची हा उद्देश पाकिस्तानातील एका जिहादी ग्रुपचा असतो. पण ही योजना फसल्याचे सनीच्या अपहरणावरून त्यांच्या लक्षात येते. त्यांच्या तावडीतून सुटून गावातून पळून जाण्याची सनीची योजना असते. पण तीही फसते. सनीच्या अशा वागणुकीमुळे त्याला एका घरात डांबले जाते. त्या घरातल्या प्रमुखाचा मुलगा आफताबशी (इनामुल हकशी) सनीची मैत्री होते.
सीमेवरून हिंदी चित्रपटांच्या पायरेटेड सीडी आणून भारतीय चित्रपट लोकांना दाखवण्याचा आफताबचा व्यवसाय असतो. त्याचे हिंदी चित्रपटांवर खूप प्रेम असते. सनीचे प्रेमही त्याला कळते. सनीला सीमेपलीकडे सोडण्यास मदत करायची असा निर्णयही आफताब घेतो. ही गोष्ट अपहरणकत्र्याना कळते. त्यामुळे दोघेही संकटात सापडतात. पण हिंदी चित्रपटांचे निस्सीम चाहते असलेले हे दोघे प्रत्येक संकटाचा मुकाबला करतात.
चित्रपटाची वैशिष्टय़े - या चित्रपटाची तीन वैशिष्टय़े सांगता येतील. भरपूर मनोरंजन करणारी कथा, कलाकारांचा सवरेत्कृष्ट अभिनय आणि महत्त्वाचे म्हणजे हेलावून टाकणारा शेवट. एका साध्या स्टोरीलाइनवर अत्यंत चांगली कथा बेतू शकते याचे उदाहरण द्यायचे झाल्यास या चित्रपटाचे देता येईल. त्यामुळे चित्रपट सुरू झाल्यावर प्रत्येक क्षणी त्याची उत्सुकता वाढत जाते. त्याचे पूर्ण श्रेय दिग्दर्शक नितीन कक्कडला द्यायलाच व्हावे. मुख्य भूमिकेतल्या शारिब हाश्मीच्या संवादातली सहजता अणि गमतीदारपणा स्क्रीप्टसाठी अत्यंत चांगली भूमिका बजावतो. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानशी कथेचा थेट आणि खोल संबंध असूनही तो पाकिस्तानविरोधी आहे असे अजिबात वाटत नाही, किंबहुना हेच त्याचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. दोन्ही देशांतल्या लोकांना हा चित्रपट तेवढाच आवडेल, आपलासा वाटेल. नजर शरमेने झुकेल असे एकही दृश्य चित्रपटात नसल्याने संपूर्ण कुटुंबासमवेत हा चित्रपट पाहता येऊ शकेल. चित्रपटात सनीच्या भूमिकेतील शारिबने उत्कृष्ट काम केले आहे. तो पहिल्याच फटक्यात बाजी मारतो. त्याच्याशिवाय दुस:या कोणाचाही या भूमिकेसाठी विचारच करता येणार नाही; तर आफताबच्या भूमिकेतील इनामुल हक्क यानेही दमदार भूमिका केली आहे. साहाय्यक भूमिकांमधील कुमुद मिश्र, गोपाल दत्त, संजय मेहता, हबीब आजमी यांनीही चांगल्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे संगीत उत्कृष्ट आहे. अरीजीत दत्ता यांच्या चाली बेहतरीन आहेत. राजस्थानमधले सौंदर्य तेवढय़ाच कलात्मकतेने सुब्रांशु दास यांनी आपल्या कॅमे:यात बंदिस्त केले आहे. एक उत्कृष्ट चित्रपट देण्यात दिग्दर्शक नितीन कक्कड यशस्वी ठरले आहेत.
चित्रपटाच्या उणिवा - मसाला चित्रपटांमध्ये अॅक्शनसिन्स, आयटम साँग आणि हॉटदृश्ये आवडणा:या प्रेक्षकांना अशा प्रकारचे मनोरंजन कदाचित आवडणार नाही. उत्तरार्धात चित्रपट थोडा लांबतो. पण पूर्ण चित्रपटच चांगला असल्याने ही उणीव झाकली जाते.