असरानींची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:26 IST2016-03-03T02:26:55+5:302016-03-03T02:26:55+5:30

‘हम अग्रेजों के जमाने के जेलर है....’ हा डायलॉग आठवतोय का..? या डायलॉगला आपल्या अंदाजाने लोकप्रिय केलेले असरानी आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहेत.

Asrani's entry into Marathi film industry | असरानींची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री

असरानींची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री

‘हम अग्रेजों के जमाने के जेलर है....’ हा डायलॉग आठवतोय का..? या डायलॉगला आपल्या अंदाजाने लोकप्रिय केलेले असरानी आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहेत. मस्तीजादे, हिंमतवाला, बोलबच्चन अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या निखळ अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे गोवर्धन असरानी आता फॅमिली ४२० या मराठी चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एंट्री करणार आहेत. देव राजनिर्मित या चित्रटपटात असराणी महत्त्वाची भूमिका ते साकारणार आहेत. या चित्रपटामध्ये सुनील पाल, उपासना सिंग, विजय पाटकर, स्वप्निल राजशेखर, हर्षदा पाटील, विजय कदम, स्वप्निल राजशेखर, सुकन्या कुलकर्णी प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करणार आहेत. असरानी यांनी अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Web Title: Asrani's entry into Marathi film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.