कलाकार भिका:यांसारखे असतात
By Admin | Updated: June 26, 2014 22:44 IST2014-06-26T22:44:18+5:302014-06-26T22:44:18+5:30
कलाकार हे भिका:यांसारखे असतात असे राणी मुखर्जीचे मत आहे.

कलाकार भिका:यांसारखे असतात
>कलाकार हे भिका:यांसारखे असतात असे राणी मुखर्जीचे मत आहे. नुकतेच राणीच्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राणी म्हणाली की, ‘मला महिलाप्रधान भूमिका करायला आवडतील; पण कलाकार भिका:यांसारखे असतात, कारण ते स्वत:चे चित्रपट स्वत: निवडू शकत नाहीत.’ ‘मर्दानी’ या चित्रपटात राणी पोलीस अधिका:याच्या भूमिकेत आहे. ती म्हणाली, ‘आम्ही कधीच चित्रपट निवडत नाहीत, तर निर्मात्यासह क्रिएटिव्ह टीम आमची निवड करीत असते, त्यामुळे आम्ही कलाकार भिका:यांसारखे असतो. मी आता मजबूत भूमिका असलेल्या चित्रपटांमध्येच काम करायचे ठरवले आहे.’