अमृता-आर्चित झळकणार 6 गुण या चित्रपटात

By Admin | Published: April 15, 2017 12:36 AM2017-04-15T00:36:53+5:302017-04-15T00:36:53+5:30

अमृता सुभाष आणि आर्चित देवधर किल्ला या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्या दोघांनी या चित्रपटात आई-मुलाची भूमिका साकारली होती. अमृता आणि आर्चितची जोडी

Amrita-Arkhak will be seen in the 6-point film | अमृता-आर्चित झळकणार 6 गुण या चित्रपटात

अमृता-आर्चित झळकणार 6 गुण या चित्रपटात

googlenewsNext

अमृता सुभाष आणि आर्चित देवधर किल्ला या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्या दोघांनी या चित्रपटात आई-मुलाची भूमिका साकारली होती. अमृता आणि आर्चितची जोडी आता किल्लानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटातही ते दोघे आई-मुलाच्या भूमिकेमध्येच दिसणार आहेत. ‘६ गुण’ असे या चित्रपटाचे नाव असून त्यात अमृता आणि आर्चितसोबतच सुनील बर्वेचीदेखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट शिक्षणांविषयी आणि शिक्षणसंस्थेविषयी भाष्य करत असून या चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली, तर या चित्रपटाची निर्मिती उज्ज्वला गावडे यांनी केली आहे.
६ गुण हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी अनेक महोत्सवात दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचा बऱ्याच महोत्सवांमध्ये गौरवदेखील झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून चित्रपटाच्या टीमला अनेक अपेक्षा आहेत. या चित्रपटात आर्चित-अमृता पुन्हा एकत्र आले असल्याने या दोघांची केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.

Web Title: Amrita-Arkhak will be seen in the 6-point film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.