अलका कुबल करणार बायोपिक

By Admin | Published: September 23, 2016 03:41 AM2016-09-23T03:41:56+5:302016-09-23T03:41:56+5:30

हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत बायोपिक येण्याचे प्रमाण फार कमी आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या मराठी बायोपिकनंतर आता

Alka Kubal will be biopic | अलका कुबल करणार बायोपिक

अलका कुबल करणार बायोपिक

googlenewsNext

हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत बायोपिक येण्याचे प्रमाण फार कमी आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या मराठी बायोपिकनंतर आता, डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अलका कुबल भूमिका साकारणार आहेत . विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना अलका कुबल यांनी सांगितले, ‘‘डॉ. तात्याराव लहाने हे त्यांच्या कार्यामुुळे साऱ्यांनाच माहीत आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचे खूप मोठे योगदान आहे. यामुळेच त्याच्याविषयी मला फार आदर आहे. अशा या मोठया व्यक्तीच्या आईची भूमिका मला साकारण्यास मिळाली याचा खूप आनंद होत आहे.’’

Web Title: Alka Kubal will be biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.