Join us

अक्षय कुमारने पीएम मोदींचा व्हिडीओ केला शेअर; सांगितल्या फिट अँड फाइन राहण्यासाठी 'या' चार स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:48 IST

अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करुन फिटनेसच्या चार सोप्या स्टेप्स सर्वांना सांगितल्या आहेत (akshay kumar, pm modi)

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला 'स्काय फोर्स' सिनेमाही प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. अक्षय कुमार फिटनेसच्या माध्यमातून तरुणाईला प्रेरणा देत असतो. अक्षय कुमारने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन अक्षयने फिट अँड फाइन राहण्यासाठी चार सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत.

अक्षयने सांगितला फिटनेस मंत्र

अक्षयने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "तुम्ही योग्य बोलला आहात. मी गेल्या अनेक वर्षांपासून हेच सर्वांना सांगत आलोय. मला आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी व्यक्त झालेत. तुम्ही निरोगी असाल तर चांगलं आयुष्य जगाल. पुरेशी झोप, मोकळी हवा, सूर्यप्रकाश, तेलाच्या ऐवजी तूप अशा गोष्टांचा वापर करुन तुम्ही लठ्ठपणाशी लढू शकता. याशिवाय कायम चालत राहा. कोणत्याही प्रकारचा वर्कआऊट करा पण तो नियमित करा. यामुळे तुमचं आयुष्य बदलेल. माझ्यावर विश्वास ठेवा आणि नवी सुरुवात करा. जय महाकाल"

मोदी काय  म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्सच्या उद्घाटनानेळी सर्वांना संबोधित केलेलं. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "सध्याच्या घडीला अनेकजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. आपल्या सर्वांना फिटनेसचं महत्व माहित असल्याने त्यासाठी आवश्यक पोषणतत्व सर्वांना मिळाली पाहिजेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार होत असतात. मला आनंद आहे की, आज आपला देश फिट इंडियाच्या माध्यमातून फिटनेस आणि निरोगी लाइफस्टाईलसाठी जागरुक आहे."

टॅग्स :अक्षय कुमारनरेंद्र मोदीहेल्थ टिप्सआरोग्यबॉलिवूड