अभिनेत्री राखींचा वाढदिवस

By Admin | Updated: August 15, 2016 12:50 IST2016-08-15T12:47:36+5:302016-08-15T12:50:38+5:30

बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांचा आज (१५ ऑगस्ट) वाढदिवस.

Actress Rakhi's birthday | अभिनेत्री राखींचा वाढदिवस

अभिनेत्री राखींचा वाढदिवस

>संजीव वेलणकर
पुणे, दि. १५ - बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांचा आज (१५ ऑगस्ट) वाढदिवस.
जन्म:- १५ ऑगस्ट १९४७
‘जीवनमृत्यू’ हा घाऱ्या डोळ्यांच्या नायिकेचा पहिला चित्रपट. तिच्या या पहिल्याच चित्रपटाने, मॅटिनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही, हा नवा ट्रेण्ड आणला. दक्षिण मुंबईतील ‘अलंकार’मध्ये हा चित्रपट मॅटिनीला १०२ आठवडे चालला. संजीवकुमार, जितेंद्र मनोजकुमार संजय खान, राजेंद्रकुमार, राजेश खन्ना, देव आनंद अश्या अनेक नायकाबरोबर कामे केली. या रूपेरी प्रवासात तिनं रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’मध्ये दिलीपकुमारची पत्नीही (अमिताभची आई) साकारली. अभिनेत्री म्हणून तिची ही सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. ‘राम लखन’, ‘डकैत’, ‘प्रतिकार’ इत्यादी चित्रपटांतून राखी चरित्र- भूमिका साकारल्या. राखी यांच्या या दीर्घ प्रवासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे गुलजार यांच्याशी झालेला विवाह आणि काही वर्षांनी बोस्कीला दिलेला जन्म. राखीशी गुलजार यांनी  मे १९७३ मध्ये लग्न केले. राखीचे ह्याचे हे दुसरे लग्न होते. तत्पूर्वी राखी ह्या अजय विश्वा स नामक एका बंगाली पत्रकाराची पत्नी होत्या. या लग्नाच्या वेळी त्यांचे वय १८ वर्षे होते. लग्नानंतर राखी यांना चित्रपटात काम करायची इच्छा होती. मात्र, अजय यांचा विरोध होता. त्यांनी बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला होता. मात्र, त्याने राखीला घेतले नव्हते. यानंतर त्याचा विरोध झुगारून राखीने बंगाली चित्रपटात काम करणे सुरू केले होते. शेवटी अजय यांच्याशी घटस्फोट घेऊन त्या मुंबईला अभिनेत्री होण्यासाठी आल्या. राखी व गुलझार यांचा काही वर्षे संसार सुरळीत चालला. त्यांना मेघना नावाची मुलगी झाली. गुलज़ार यांचा बहुतांश वेळ शायरी आणि गीत रचण्यात जात होता. ते राखी यांना खूप कमी वेळ देत असत. एकटेपणामुळे राखी यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच. याच वेळी यश चोपडा यांनी ‘कभी कभी’साठी राखी यांना ऑफर दिली व ती गुलज़ार यांना न सांगताच स्वीकारली. ‘कभी कभी’ झळकला, प्रचंड हिट झाला. त्यांनी सुंदर अभिनय केला. मात्र, यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आले. गुलज़ार यांनी आपल्या ‘मौसम’ या चित्रपटात राखीला डावलून शर्मिला टागोरला घेतले होते. याचा सुप्त राग राखीच्या मनात होता व त्यामुळेच त्यांनी ‘कभी कभी’ करण्याचे धाडस केले असे म्हणले जाते. अमिताभसोबत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘बरसात की एक रात’ मध्ये ती त्याची प्रेयसी, तर ‘कस्मे वादे’ मध्ये पत्नी झालीच, पण ‘शक्ती’ मध्ये त्याची आईदेखील तिनं साकारली. ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘शान’, ‘जुर्माना’, ‘बेमिसाल’ अशा अनेक चित्रपटांतून अमिताभ-राखी विविध नात्यांनी प्रेक्षकांसमोर आले. ‘कभी कभी’तही ते दोघं होते. त्यात ती अमिताभची प्रेयसी असली तरी पुढं ‘कहानी एक ऐसा मोड लेती है’ की ती शशी कपूरची पत्नी होते.
लोकमत समूहातर्फे मा. राखी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 
मा.राखीजींनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी
पल पल दिल के पास
कभी कभी मेरे दिल मे
खिल ते गुल यहा
मेघा छाये आधी रात
नदीया किनारे हमरा गां

Web Title: Actress Rakhi's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.