बिकनी लूकमध्ये "या" अभिनेत्रीने केली निया शर्मावर मात
By Admin | Updated: April 5, 2017 13:51 IST2017-04-05T13:40:44+5:302017-04-05T13:51:56+5:30
छोटया पडद्यावर सून, वहिनी, नंणदेचा रोल करणा-या या अभिनेत्रींचा वास्तवातील ग्लॅमरस लूक घायाळ करणारा असतो.

बिकनी लूकमध्ये "या" अभिनेत्रीने केली निया शर्मावर मात
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे छोटया पडद्यावरील अभिनेत्रींचा सेक्सी लूकही सध्या चर्चेचा विषय बनला आहे. छोटया पडद्यावर सून, वहिनी, नंणदेचा रोल करणा-या या अभिनेत्रींचा वास्तवातील ग्लॅमरस लूक घायाळ करणारा असतो. छोटया पडद्यावरील आपल्या बोल्ड, सेक्सी इमेजसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. डिसेंबरमध्ये वर्षअखेरीस आशियातील सेक्सी महिलांची एक यादी प्रसिद्ध झाली. त्यात नियाला तिसरा क्रमांक मिळाला होता.
पण आता सेक्सी लूकमध्ये निया शर्माला छोटया पडद्यावरील एका अभिनेत्रीने मागे सोडले आहे. अलीकडे बॉलिवूडलाईफ.कॉम या वेबसाईटने बिकनी लूकमध्ये कोण जास्त मादक दिसते यावर पोल घेतला. आश्चर्य म्हणजे कुमकुम भाग्य मालिकेतील मुख्य अभिनेत्री श्रीती झा ने या पोलमध्ये निया शर्मावर मात केली.
श्रीतीला जवळपास 60 टक्के मते मिळाली तिच्या पाठोपाठ तनुची भूमिका करणा-या लीना झुमानी दुस-या क्रमांकाची मते मिळाली. आश्चर्य म्हणजे निया शर्मा थेट तिस-या स्थानावर फेकली गेली. प्रेक्षकांना श्रीती ज्या फोटोमध्ये जास्त बोल्ड वाटली तो फोटो थायलंडमधला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्रीती थायलंडला गेली होती. त्यावेळचा तिचा बिकनी लूकमधला तो फोटो आहे. लीन झुमानी आणि अन्य मित्रपरिवार यावेळी श्रीतीसोबत होता.