शाहरुखच्या शूटिंगमध्ये अबरामचा व्यत्यय

By Admin | Updated: June 9, 2014 14:52 IST2014-06-09T14:51:15+5:302014-06-09T14:52:47+5:30

चक्क एका लहान मुलामुळे शाहरुख खानच्या आगामी ‘हॅप्पी न्यू ईअर’ची शूटिंगमध्ये व्यत्यय आला.

Abiram interrupts in Shah Rukh's shoot | शाहरुखच्या शूटिंगमध्ये अबरामचा व्यत्यय

शाहरुखच्या शूटिंगमध्ये अबरामचा व्यत्यय

>चक्क एका लहान मुलामुळे शाहरुख खानच्या आगामी ‘हॅप्पी न्यू ईअर’ची शूटिंगमध्ये व्यत्यय आला. किंग खानच्या कामात खोळंबा करणारा हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून त्याचाच छोटा मुलगा अबराम आहे. शाहरुख सध्या ‘हॅपी न्यू ईअर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवर शाहरुख छोट्या अबरामला घेऊन पोहोचला. अबरामचे येताच शूटिंग थांबली. सेटवर उपस्थित सर्वांच्या नजरा अबरामवर खिळल्या. शाहरुख आणि गौरीने अबरामला सेरोगेसी तंत्राने जन्म दिला आहे. नुकताच अबराम एक वर्षाचा झाला. शाहरुख आणि गौरी सतत त्याला माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे विशेष.
 

Web Title: Abiram interrupts in Shah Rukh's shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.