अभिजित झळकणार इरफान खानसोबत

By Admin | Published: June 10, 2017 12:53 AM2017-06-10T00:53:42+5:302017-06-10T00:53:42+5:30

अभिनय देव रायता या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटात अभिजित चव्हाण एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Abhijit will be seen with Irrfan Khan | अभिजित झळकणार इरफान खानसोबत

अभिजित झळकणार इरफान खानसोबत

googlenewsNext

अभिनय देव रायता या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटात अभिजित चव्हाण एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो इरफान खानसोबत काम करत आहे. इरफानसारख्या दिग्ग्ज अभिनेत्यासोबत काम करायला मिळत असल्याने तो सध्या खूपच खूश आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंगद्वारे त्याच्या या नव्या चित्रपटाविषयी सांगितले आहे. त्याने इरफानसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यात म्हटले आहे की, ‘अभिनय देहबोलीतून अत्यंत सूक्ष्म रूपात कसा प्रकट करायचा,’ हे इरफान खानचे कसब आहे. प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वळवून आणि खिळवून ठेवण्याची त्याच्यात ताकद आहे. यामुळे मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे. त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले. अभिनय देव दिग्दर्शित रायता हा चित्रपट करताना इरफानसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे क्षण पुन्हा पुन्हा येवोत, अशी अपेक्षा. अभिजितने इरफानची स्तुती करणारी ही पोस्ट फेसबुकला पोस्ट करत इरफानसोबतचा एक सेल्फीदेखील अपलोड केला आहे. या सेल्फीविषयी देखील त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘मी सेल्फी मागितल्यावर झोपलेला इरफान टणकन उडी मारून बसला आणि त्याने मनापासून सेल्फी दिला.’

Web Title: Abhijit will be seen with Irrfan Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.