चीनमध्ये आमिरची ‘धूम’
By Admin | Updated: July 31, 2014 23:15 IST2014-07-31T23:15:34+5:302014-07-31T23:15:34+5:30
बॉलीवूडच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘धूम-३’ या चित्रपटाने आता चीनमध्येही यश मिळवले आहे

चीनमध्ये आमिरची ‘धूम’
बॉलीवूडच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘धूम-३’ या चित्रपटाने आता चीनमध्येही यश मिळवले आहे. चीनच्या ४०० शहरांत २,००० स्क्रीन्सवर हा चित्रपट रिलीज झाला असून आमिर खान-कॅटरिना कैफ यांचा हा चित्रपट तेथील टॉप १० चित्रपटांमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट चिनी प्रेक्षकांच्या एवढा पसंतीस उतरला आहे की, त्यापुढे ‘नो ज्युओ नो डाय’ हा रोमँटिक चिनी चित्रपट टिकू शकला नाही. ‘धूम-३’ने चीनमध्ये तीन दिवसांतच ८.१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट चीनच्या टॉप १० चित्रपटांमध्ये नवव्या स्थानावर आहे. काही तज्ज्ञांनुसार हा चित्रपट चीनमधील भारताचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरेल.