Ganesh Chaturthi : देव पाहावा वृक्षात....! बाप्पासोबत रोपटे पूजन करण्याची वनविभागाची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 09:08 AM2020-08-22T09:08:37+5:302020-08-22T09:12:57+5:30

निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने नागरिकांनी बाप्पांच्या पर्यावरणपूरक लहान मूर्तीसोबत एका देशी प्रजातीच्या रोपट्याचेही पूजन करत अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी.

Ganesh Chaturthi eco friendly ganeshotsav in nashik | Ganesh Chaturthi : देव पाहावा वृक्षात....! बाप्पासोबत रोपटे पूजन करण्याची वनविभागाची साद

Ganesh Chaturthi : देव पाहावा वृक्षात....! बाप्पासोबत रोपटे पूजन करण्याची वनविभागाची साद

googlenewsNext

नाशिक - आपल्या सर्वांचा लाडका उत्सव अर्थात गणेशोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने नागरिकांनी बाप्पांच्या पर्यावरणपूरक लहान मूर्तीसोबत एका देशी प्रजातीच्या रोपट्याचेही पूजन करत अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी अन देव वृक्षात पाहावा..., असे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस गणेशोत्सवाचे स्वरूप व्यापक होत असले तरीदेखील यंदा या उत्सवावर कोरोनाचे गंभीर सावट आहे.  गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी दरवर्षी विविध उपाययोजनांची आपण अंमलबजावणी करतोच त्याचाच एक भाग म्हणजे मूर्ती, निर्माल्यदान होय. याद्वारे आपण जलप्रदूषण थांबवून पर्यावरण व नदी संवर्धनाला हातभार लावतो अन उत्सवकाळात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करतो. याच धर्तीवर नाशिक पश्चिम वनविभागाने अनोखी संकल्पना मांडत गणेशोत्सव काळात प्रत्येक कुटुंबाने वृक्षपूजन करत दहा दिवसानंतर कुंडीतील रोपाची योग्य ठिकाणी लागवड करुन त्याची वृक्षात रूपांतर होण्यापर्यंत योग्य देखभाल करुन गणेशोत्सवाची आठवण कायमस्वरूपी जपावी, यासाठी सवलतीच्या शासकीय दरात रोपे पुरविण्याची तयारीसुद्धा वनविभागाने दर्शविली आहे.

सध्या महाराष्ट्रात पूरक पाऊस असल्यामुळे  मोकळ्या जागेत लावलेले रोपटे लवकर तग धरण्यास मदत होईल आणि ते श्रींच्याकृपेने चांगले वाढेलसुद्धा. त्यामुळे या पर्यावरणपूरक उपक्रमाला नाशिककरांनी अधिकाधिक साथ द्यावी असे आवाहन वनखात्याने केले आहे.

अशी आहे संकल्पना

बाजारात उपलब्ध होणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू मातीच्या मूर्तीची पूजा करून विसर्जन करत असतो. यात वापरल्या जाणाऱ्या रंगांचा रसायनांचा परिणाम आपल्या निसर्गावर होताना आपण बघतो. आपल्या सर्वांच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भावनांचा आदर करून आपण निसर्गाप्रतीही आदरभाव जोपासावा. यावर्षी शाडूमातीपासून बनविलेल्या श्रींच्या लहान मूर्तीसोबत एका भारतीय जातीच्या रोपाचे दहा दिवस पूजा आणि सांभाळ करून विसर्जनाच्या वेळी आपल्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत लागवडीचा संकल्प करावा. कार्यालयात आवळा, जांभूळ, अर्जुनसादडा, करंज, कदंब, बेहडा यांसारख्या प्रजातीची रोपे उपलब्ध करुन दिली गेली आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रोपे खरेदी करून त्याची लागवड व संवर्धन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.

नाशिक पश्चिम वनविभागाचे सुमारे 50 ते 100 अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होत रोपट्यांचे बाप्पासोबत पूजन करत विसर्जनाच्या मुहूर्तावर लागवड करून संगोपन करणार आहेत.  यातुन आपल्याला झाडामध्ये देव बघता येईल. तसंही चराचरात ईश्वराचा वास आहेच. 
फारतर बाप्पाच्या लहान मुर्तीसोबत आपण झाडाचे पुजनही करू शकतो. झाडे लावणे आणि ते जगविणे व सण उत्सवांना पर्यावरणपुरक करण्याचा यामागील उद्देश आहे.  

- गणेश झोळे, सहायक वनसंरक्षक, नाशिक

Web Title: Ganesh Chaturthi eco friendly ganeshotsav in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.