'निकाल' लावायची खरी वेळ येईल, निकालानंतर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:13 IST2026-01-16T08:13:32+5:302026-01-16T08:13:49+5:30

निकाल सांगून आज 'ईव्हीएम' शांत होतील; पण ईगो, परस्पर संशय आणि सत्ताकांक्षा मात्र अधिकच गोंगाट करायला लागतील, हे नि:संशय!

BMC Results and Beyond Can the Thackeray Duo Stay United While BJP Battles Internal Rift | 'निकाल' लावायची खरी वेळ येईल, निकालानंतर..

'निकाल' लावायची खरी वेळ येईल, निकालानंतर..

यदु जोशी

महापालिकेच्या निवडणुकीनंतरही शिल्लक उरेल आणि चर्चेत राहील असे बरेच काही आहे. राजकारण संपत नसते; निकालानंतर आधीपेक्षा अधिक स्पष्टता येते एवढेच. दोन मित्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी भाजपचे संबंध कसे असतील हे पाहणे सर्वात औत्सुक्याचे असेल. भाजप आणि शिंदेसेना मुंबई, ठाण्यात एकत्र लढले; पण कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत या दोन पक्षांमध्ये जे राडे झाले त्याचे पडसाद पुढेही उमटत राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील रस्सीखेच ठाण्याच्या पट्ट्यात पुढेही दिसेल. भविष्यात या दोन पक्षांमध्ये टोकाचे ताणले गेले तर त्याचा केंद्रबिंदू याच पट्टयात असेल. जिथे भाजप शिंदेसेनेच्या मदतीने जिंकेल वा निकालानंतर दोघे एकत्र येतील तिथेही शिंदेसेनेला सत्तेत वाटा देता-देता भाजपच्या नाकीनऊ येतील.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांच्या पक्षाला सोबत घेत भाजपविरोधात निवडणूक लढवली. मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेसेना यांची सत्ता आली तर शिंदे भाजपच्या अधिक जवळचे असतील. त्याच वेळी पुणे वा पिंपरी-चिंचवडपैकी भाजपचा एक गड जरी अजित पवार यांनी खालसा केला तरी दोन पक्षांमधील कटुता वाढेल. इतके आरोप करूनही अजित पवार दोन्हीकडे हरले तर त्यांच्या आरोपांना मतदारांनी गांभीर्याने घेतले नाही असे म्हणत भाजप या आरोपांना किंमत देणार नाही; पण एका ठिकाणी जरी ते जिंकले तर मग त्यांच्या आरोपांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता येईल. 'पक्षाला फंड मिळावा म्हणून तत्कालीन युती सरकारने (भाजप-शिवसेना) सिंचन प्रकल्पाची किंमत १०० कोटी रुपयांनी वाढविली होती,' असा आरोप मतदानाच्या एक दिवस आधी करून अजित पवारांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अन्य गंभीर आरोपही भाजपवर केले. निवडणूक संपली तरी या आरोपांनी भाजपला झालेल्या जखमांचे भाजप काय करणार यावर दोघांमधील संबंध अवलंबून असतील. या आरोपांची झळ आपल्याला बसू शकते याची कल्पना अजितदादांनाही असणारच; पण यावेळी आरोपांची स्क्रिप्ट त्यांनी काकांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेली दिसते. एक आणखी महत्त्वाचे म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत; 'एकत्र राहण्यासाठी' हे महापालिका निवडणुकीपुरते झाले. पुढेही ते असेच घट्ट एकत्र राहतील का, याबद्दलही उत्सुकता असेल.

भाजप अंतर्गत गटबाजी

 काही महापालिकांमध्ये भाजपला अंतर्गत वादाचा फटका बसेल. पहिले नाव चंद्रपूरचे. तेथे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्यातून विस्तव जात नाही. दोघांनी निवडणुकीच्या काळात एकमेकांविरुद्ध आगपाखड केली. मुनगंटीवार यांनी पक्षनेतृत्वावरही टीका केली. सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला जोरगेवार यांनी विरोध केल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. याची झळ भाजपला बसेल असे दिसते.

दुसरी अमरावती. तिथे भाजप आणि स्वाभिमानीचे आमदार रवी राणा यांच्यात आधी युती झाली. मतदानाच्या पाचएक दिवस आधी भाजपने युती तोडली. 'ना राणा, ना पान्हा (राणा यांची निशाणी), आता फक्त कमळ निवडून आणा,' असे मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केले. माजी खासदार आणि राणा यांच्या पत्नी नवनीत या भाजपमध्ये आहेत. मात्र, तेथे नवनीत भाजपविरोधात आणि पतीच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याच्या तक्रारी भाजपच्या नेत्यांनी केल्या. 'त्या इतके सगळे करत असूनही नेतृत्व त्यांचे इतके लाड का करते' असा सवाल भाजपचे नेते निवडणुकीभर करत होते. या प्रश्नाचे उत्तर निकालाचे विश्लेषण केल्यानं नेतृत्वाला द्यावे लागेल. अमरावती महापालिकेती अंतर्गत गोंधळाचा मार भाजपला बसेल, असे दिसतं सोलापूर हेही भाजपसाठी डोकेदुखीचे श बनले आहे. उद्या कदाचित सत्ता येईलही; प पालकमंत्री जयकुमार गोरे-आ. सचिन कल्याणशेट्ट आ. देवेंद्र कोठे आणि दुसरीकडे आ. सुभदेशमुख-आ. विजय देशमुख हे कटुतेचे वातावर कायम राहणे पक्षाला परवडणारे नाही.

काँग्रेस फुलटॉस का देते? 

लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पैसे जानेवारीला बँक खात्यात टाकण्याची कोणती तयारी महिला व बालकल्याण विभागाने केले नव्हती. मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर टाकला, ते म्हणाले की 'आम्ही दोन महिन्यांचे एकदम देणार आहोत', झाले; काँग्रेसने जणू हा निण् झाला अन् हे निवडणुकीतील आमिष असे गृर्ह धरून निवडणूक आयोगाला पत्र दिले. आयोग सरकारकडून खुलासा घेतला आणि निर्देश दिले तुम्हाला तसे काही करता येणार नाही. मुळात सरक असे दोन महिन्यांचे एकत्र पैसे देणार नव्हतेच; प काँग्रेसने आयोगाला पत्र देऊन 'लाडक्या बहिणी पैसे मिळताहेत ते कॉंग्रेसला सहन होत नाही,' अ टीका करण्याची संधी भाजपला दिली. भाजपला अ फुलटॉस देण्याचे काँग्रेसला ऐनवेळी का सुच्च असावे? राजकारणात संयम ही सर्वात अवघ् गुंतवणूक असते आणि काँग्रेसला ती कशी जमत नाः हे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले. 

yadu.joshi@lokmat.com
 

Web Title : चुनाव नतीजों के बाद असली परीक्षा: भाजपा, शिंदे, पवार की भूमिका अहम।

Web Summary : चुनाव के बाद, शिंदे और पवार के साथ भाजपा के संबंध महत्वपूर्ण होंगे। चंद्रपुर और अमरावती में भाजपा के आंतरिक संघर्ष परिणामों को प्रभावित कर सकते हैं। कांग्रेस की चुनाव आयोग में शिकायत उलटी पड़ी, जिससे भाजपा को फायदा हुआ। भविष्य के राजनीतिक समीकरण अनिश्चित हैं।

Web Title : Real test after election results: BJP, Shinde, Pawar dynamics key.

Web Summary : Post-election, BJP's relationships with Shinde and Pawar will be crucial. Internal BJP conflicts in Chandrapur and Amravati may impact results. Congress's election commission complaint backfired, handing BJP an advantage. Future political equations are uncertain.