धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये तणाव, शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:56 IST2026-01-15T13:56:30+5:302026-01-15T13:56:34+5:30
Dhule Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग १८ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठी खळबळ उडाली.

धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये तणाव, शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
धुळे - महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग १८ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठी खळबळ उडाली.
मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उमेदवार सतीष महाले आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
पोलिसांची तत्परता: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे.