उंबऱ्याला ठेच लागून पडून तरुणाचा मृत्यू

By दत्ता यादव | Updated: October 24, 2022 20:10 IST2022-10-24T20:07:45+5:302022-10-24T20:10:11+5:30

खानापूर येथे मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

Youth dies after small accident in Satara Khanapur | उंबऱ्याला ठेच लागून पडून तरुणाचा मृत्यू

उंबऱ्याला ठेच लागून पडून तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: झोपेतून उठून रात्री बाहेर जाताना उंबऱ्याला ठेच लागून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील खानापूर येथे मध्यरात्री घडली. भगवान नामदेव गाडे (वय ३५, रा. खानापूर, ता. सातारा) असे ठेच लागून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भगवान गाडे हा रात्री घरात झोपला होता. रात्री तो लघूशंकेसाठी झोपेतून उठला. घराबाहेर जाताना उंबऱ्याला ठेच लागून तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. परंतु रात्री हा प्रकार त्याने कोणालाही सांगितला नाही. स्वत:हून परत अंथरुणात जाऊन तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता तो अचानक आकडी आल्यासारखे करू लागला. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Youth dies after small accident in Satara Khanapur