मनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:00 IST2019-12-19T06:37:31+5:302019-12-19T07:00:20+5:30

निळजे आणि दातीवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रिजवर हा अपघात झाला.

MNS MLA's RAJU PATIL son's 'Mustang' collapses on the railway track; Konkan Railway disrupted | मनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत

मनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत

डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मुलाची आलिशान कार फोर्ड मस्तंग रात्री सव्वा अकराच्या सुमारास उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळांवर कोसळल्याने अपघात झाला. निळजे आणि दातीवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रिजवर हा अपघात झाला. या दरम्यान कोणतीही ट्रेन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. 


मस्तंग कार रेल्वे मार्गावर कोसळल्याने या मार्गावरील दिवा-पनेवल वाहतूक थांबविण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ तपासल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू केली. हा अपघात रॅश ड्रायव्हिंगचा असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आदित्य प्रमोद पाटील असे पाटील यांच्या मुलाचे नाव असून त्यांचा चालक ही कार चालवत होता. 

आदित्य यांना या अपघातात दुखापत झालेली नसून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: MNS MLA's RAJU PATIL son's 'Mustang' collapses on the railway track; Konkan Railway disrupted