विरार पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार, मंदिरात महिलेची पर्स चोरी करणारा होता आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 22:12 IST2023-10-10T22:12:12+5:302023-10-10T22:12:53+5:30
याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

विरार पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार, मंदिरात महिलेची पर्स चोरी करणारा होता आरोपी
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी विरार परिसरात मंदिरात महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपीला रविवारी पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मनोहर पार्टे (४८) असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी मनपाच्या जीवदानी रुग्णालयात आणले असताना तो एका पोलिसाला धक्का मारून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास बंदोबस्ताला असलेला पोलीस कर्मचारी चंदनशिवे याच्या हाताला झटका देऊन पार्टे पसार झाला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.