कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह असतो. सहकारी खेळाडूंची फिरकी घेणे त्याला फार आवडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:06 PM2020-05-11T13:06:00+5:302020-05-11T13:07:50+5:30

whatsapp join usJoin us
Yuzvendra Chahal crashes Katrina Kaif’s live chat, says ‘Hi Mam’ svg | कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी

कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह असतो. सहकारी खेळाडूंची फिरकी घेणे त्याला फार आवडते.  सध्या लॉकडाऊनमुळे सोशल मीडियावरून तो खेळाडूंची फिरकी घेत आहे. लॉकडाऊनमुळे खेळाडूंना घरीच रहावे लागत आहेत आणि त्यामुळे ते एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. पण, त्यातही चहल मध्येच एन्ट्री घेत खेळाडूंना सतावत आहे. आता तर चहलनं चक्क बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या लाईव्ह चॅटमध्ये एन्ट्री घेतली.

ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!

कॅटरिना लाईव्ह चॅटमध्ये शारीरिक तंदुरूस्तीबाबत सल्ला देत होती. त्यावेळी चहलनं मधीच मॅसेज केला. त्यानं लिहीलं की,''हाय कॅटरिना मॅम'' 2017मध्ये एका मुलाखतीत चहलनं त्याला कॅटरिनाचे हास्य आवडत असल्याचे सांगितले होते.  यापूर्वी चहलनं अऩुष्का शर्मा हिच्या लाईव्ह चॅटमध्येही असाच मॅसेज पाठवला होता.  

काही दिवसांपूर्वी अनुष्कानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती कोहलीला चौका मार ना, असे चिअर करताना पाहायला मिळाली होती. त्यावरून चहलनं अनुष्काकडे एक विनंती केली. पुढच्या वेळेस चहलला ओपनिंगला पाठव अशी इच्छा कोहलीकडे व्यक्त कर, असं चहलनं लिहीले होते.  

धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी 

वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!

महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार

टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?

Web Title: Yuzvendra Chahal crashes Katrina Kaif’s live chat, says ‘Hi Mam’ svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.