पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी (22 मे) भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं असून यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये फिरकीपटू यासीर शाह याचा समावेश असल्याची चर्चा काल दिवसभर रंगली. सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजलीही वाहण्यात आली. पण, हे खरं आहे का?
शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार
पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील अखेरच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगदेखील समोर आलं आहे. एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते. त्यानंतर आता या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले.
यासीर शाहच्या निधनाचे वृत्ता खोटं असून तो तंदुरुस्त आहे. त्यानं स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. त्यानं लिहिलं की,''मी माझ्या घरी सुरक्षित आहे. मी त्या विमानानं प्रवास करत नव्हतो. या अपघातात मृत झालेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो.'' पण, त्यानं हे ट्विट नंतर डिलिट केलं.
![]()
दरम्यान, सोमवारी यासीरच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले. कन्यारत्न झाल्याची माहिती त्यानं दिली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!
15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन
इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video
सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव
Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग
गौतम गंभीर अन् टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली
पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार?