South Africa vs Australia, Final Day 3 : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव २०७ धावांवर आटोपला आहे. मिचेल स्टार्कनं नाबाद ५८ धावांच्या खेळीसह जोश हेजलवूडच्या साथीनं १० व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना शेवटच्या विकेटसाठी चांगलेच तंगवले. ही भागीदारी सामन्यात निर्णायक ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. पहिल्या डावातील ७४ धावांच्या अल्प आघाडीसह दुसऱ्या डावात केलेल्या २०७ धावांसह ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २८२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल स्टार्कचं दमदार अर्धशतक; हेजलवूडच्या साथीनं ५९ धावांची उपयुक्त भागीदारी
ऑस्ट्रेलियन संघाने ८ बाद १४४ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. यात अवघ्या ४ धावांची भर पडल्यावर रबाडाने नॅथन लायनला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या दोघांनी १० विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. मार्करमनं हेजलवूडला झेलबाद करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर रोखला. दुसऱ्या बाजूला मिचेल स्टार १३६ चेंडूचा सामना करून ५८ धावांवर नाबाद राहिला.
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातून दोन डावात तीन अर्धशतके, दक्षिण आफ्रिकेची पाटी कोरीच
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या लढतीत पहिल्या दोन दिवसांत गोलंदाजांनी हवा केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाकडून स्टीव्ह स्मिथ- ६६ (११२) आणि वेबस्टर ७२ (९२) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून रबा़डाने सर्वाधिक ५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. त्यानंतर पॅट कमिन्सनं पंजा मारत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात स्टार्कच्या अर्धशतकासह या फायनल लढतीत तिसरे अर्धशतक पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एकाही खेळाडूनं अद्याप अर्धशतक झळकावलेले नाही. जर २८२ धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करुन इतिहास रचायचा असेल तर फलंदाजीत किमान एकाच्या भात्यातून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
Web Title: WTC Final SA vs AUS Day 3 Mitchell Starc Fifty Australia 207 all out South Africa needs 282 runs to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.