Temba Bavuma Fighting half century, SA vs AUS WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या (२०२३-२५) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकाने चौथ्या डावात अख्खा डाव पालटला. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या जेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमने झंझावाती शतक ठोकले. पण त्यासोबतच आफ्रिकन कर्णधार टेम्बा बवुमाते झुंजार अर्धशतकही कौतुकाचा विषय ठरला. स्नायूंची दुखापत झाली असतानाही तो देशासाठी लढला आणि उपयुक्त खेळी केली.
दुखापतग्रस्त बवुमा डोंगरासारखा क्रिजवर उभा राहिला...
एडन मार्करामने ११ चौकारांसह दमदार शतक ठोकले. त्याला टेम्बा बावुमाने अप्रतिम साथ दिली. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने वेदना सहन करतानाही बावुमाने देशासाठी मैदाना राखले. बावुमाच्या या धाडसी खेळीने मार्करामलाही ऊर्जा मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात टेम्बा बावुमा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. डावाच्या सुरुवातीला तो फारसा फॉर्मात नव्हता. २६ चेंडू खेळून झाल्यावर त्याला पहिली धाव काढता आली. त्यानंतर २ धावांवर असताना स्टीव्ह स्मिथने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. काही षटकांनंतर बवुमाची दुखापत वाढली. धाव घेताना त्याचा हॅमस्ट्रिंगचा स्नायू खेचला गेला. आफ्रिकेच्या डावाच्या २४ व्या षटकात अवघ्या ९ धावांवर असताना तो कळवळला. त्याच्यावर फिजीओने उपचार केले. वेदनेने कण्हत आणि लंगडत तो पुन्हा उठला आणि त्याने कांगारू गोलंदाजांना भिडला. पाहा व्हिडीओ-
------------
अर्धशतकी खेळीने विजयाच्या समीप...
टेम्बा बवुमा खेळाच्या तिसऱ्या दिवशी नाबाद राहिला. वेदनेत असताना कसाबसा धावत पळत त्याने अर्धशतकी खेळी केली. चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा मात्र त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. पण मार्करमला हवी असलेली साथ देत वबुमाने अर्धशतक ठोकले आणि संघाला विजयासमीप नेले. वबुमाने १३४ चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने ५ चौकार ठोकले आणि ६६ धावा केल्या.
Web Title: WTC Final 2025 SA vs AUS Video Painful limping while running but still Temba Bavuma played fighting half century against Australian bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.