WTC Final 2021 IND vs NZ : मोठी अपडेट; आजचा खेळ होणार की नाही?, बीसीसीआयनं दिली Big Breaking! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 06:48 PM2021-06-18T18:48:49+5:302021-06-18T18:49:48+5:30

World Test Championship (WTC) final India vs New Zealand :  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे

WTC final 2021 Ind vs NZ Test : Umpires will have an inspection at 7.30 pm IST at Southampton  | WTC Final 2021 IND vs NZ : मोठी अपडेट; आजचा खेळ होणार की नाही?, बीसीसीआयनं दिली Big Breaking! 

WTC Final 2021 IND vs NZ : मोठी अपडेट; आजचा खेळ होणार की नाही?, बीसीसीआयनं दिली Big Breaking! 

Next

World Test Championship (WTC) final India vs New Zealand :  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. आजपासून ते 22 जून या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात हा ऐतिहासिक सामना होणार आहे. पण, या पाचही दिवसांवर पावसाचे सावट आहे. या सामन्याचा निकाल लागावा यासाठी आयसीसीनं 23 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. अडीच-तीन तासांचा वेळ वाया गेल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली आहे. मैदान सुकवण्याचं काम सुरू असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता पंच खेळपट्टीची पाहणी करून  निर्णय देणार आहेत.WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final


 भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी  IND vs NZ World Test Championship

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग IND vs NZ World Test Championship, 

पाऊस थांबला अन् अश्विनची कन्या नाचायला लागली...

विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला...
 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची  समान विभागणी केली जाईल.   WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Umpires will have an inspection at 7.30 pm IST at Southampton 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app