WTC Final 2021 IND vs NZ : 14 वर्षांत प्रथमच टीम इंडिया या दिग्गज खेळाडूशिवाय ICCची फायनल खेळणार, विराट कोहलीला त्याची उणीव जाणवणार?

WTC final 2021 Ind vs NZ Test : कसोटी अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच होत आहे आणि भारतानं फायनलमध्ये प्रवेश करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 03:05 PM2021-06-18T15:05:36+5:302021-06-18T15:06:06+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Indian cricket team 1st time playing icc event final without ms dhoni | WTC Final 2021 IND vs NZ : 14 वर्षांत प्रथमच टीम इंडिया या दिग्गज खेळाडूशिवाय ICCची फायनल खेळणार, विराट कोहलीला त्याची उणीव जाणवणार?

WTC Final 2021 IND vs NZ : 14 वर्षांत प्रथमच टीम इंडिया या दिग्गज खेळाडूशिवाय ICCची फायनल खेळणार, विराट कोहलीला त्याची उणीव जाणवणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय क्रिकेट संघ आज आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.  कसोटी अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच होत आहे आणि भारतानं फायनलमध्ये प्रवेश करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. विराट कोहलीलाआयसीसीची महत्त्वाची ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे आणि त्यानेही कंबर कसली आहे. पण, विराटला एका दिग्गज खेळाडूची उणीव प्रकर्षानं जाणवणार आहे. 14 वर्षांत प्रथमच भारताचा संघ आयसीसीच्या फायनलमध्ये या दिग्गज खेळाडूशिवाय मैदानावर उतरणार आहे. तो दिग्गज खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni).

 बीसीसीआयनं सांगितली वाईट बातमी, क्रिकेट चाहत्यांचा झाला हिरमोड 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2007नंतर आयसीसी स्पर्धेची ही पहिली फायनल असेल की ज्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये धोनी हे नाव नसेल. 2007पासून भारतीय संघानं आयसीसी स्पर्धेच्या पाच फायनल खेळल्या. धोनीनं 2007मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाळी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप फायनल खेळला होता आणि त्यात बाजी मारली होती. 2011मध्येही वन डे वर्ल्ड कप उंचावला होता. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

त्यानंतर 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2014च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीच्या नेृत्वाखाली भारताने फायनल खेळली, परंतु श्रीलंकेकडून त्यांना हार मानावी लागली होती. 2017 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली होती. पण, पाकिस्तानकडून त्यांना हार मानावी लागली होती. आता 14 वर्षांत प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये धोनीशिवाय टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे.
या कालावधीत 2015च्या वर्ल्ड कपची उपांत्य फेरी, 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि 2019च्या वर्ल्ड कपची उपांत्य फेरीत टीम इंडिया खेळली होती आणि धोनी संघाचा सदस्य होता. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. IND vs NZ World Test Championship, WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today
 

 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Indian cricket team 1st time playing icc event final without ms dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.