WTC Final 2021 IND vs NZ : ७ षटकांचा खेळ गेला वाया; भारत-न्यूझीलंड कसोटीच्या पाचव्या दिवसाचे मोठे अपडेट्स

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:50 PM2021-06-22T15:50:45+5:302021-06-22T15:51:06+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : 7 overs have been lost from Day 5 play, 91 overs to be bowled today by 4.00pm | WTC Final 2021 IND vs NZ : ७ षटकांचा खेळ गेला वाया; भारत-न्यूझीलंड कसोटीच्या पाचव्या दिवसाचे मोठे अपडेट्स

WTC Final 2021 IND vs NZ : ७ षटकांचा खेळ गेला वाया; भारत-न्यूझीलंड कसोटीच्या पाचव्या दिवसाचे मोठे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही पावसानं अडथळा आणला, परंतु आतापर्यंत १४१ षटकांचा सामना झाला आहे. आजच्या पावच्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशीरानं सुरू होणार आहे. साऊदॅम्प्टन येथील हवामानाचा लहरीपणा लक्षात घेता उर्वरीत दोन दिवसांत १९६ षटकांचा खेळ होणे अशक्य आहे आणि अशात भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. आता साऊदॅम्प्टन येथे पावसानं विश्रांती घेतली आहे आणि खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले आहेत. हाती आलेल्या अपडेट्स माहितीनुसार ४ वाजता सुरू होणार आहे.  ( UPDATE: Finally, we've got some good news for you. Play begins at 4 PM IST)

सामना ड्रॉ झाला तर?; सुनील गावस्कर यांचा ICCला सल्ला, ठरेल विजेता संघ!


तिसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला. कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेतल्या.  त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी किवी सलामीवीरांना माघारी पाठवले आहे. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर आहे आणि तिसऱ्या दिवसअखेर किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या आहेत. चौथ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही, पावसामुळे संपूर्ण दिवस पाण्यात गेला. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची  समान विभागणी केली जाईल.  
 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : 7 overs have been lost from Day 5 play, 91 overs to be bowled today by 4.00pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.