WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:29 PM2021-06-23T23:29:31+5:302021-06-23T23:32:00+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final 2021 IND vs NZ: New Zealand wins by beating Team India, Find out the prize money! | WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रॉस व केन या जोडीनं नाबाद ९६ धावा जोडल्या अन् जेतेपद नावावर केले. किवी यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग याची ही अखेरची कसोटी असल्यानं त्याला संघानं विजयी भेट दिली. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final


भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु रिषभ पंत व रोहित शर्मा वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले अन् भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. केन व रॉस अनुक्रमे ५२ व ४७ धावांवर नाबाद राहिले. 

संक्षिप्त धावफलक - भारत ( पहिला डाव) - २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) - १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) - २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६,  इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) - २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७)  

न्यूझीलंडनं कमावले जवळपास १२ कोटी अन् मानाची गदा...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली होती. 

Web Title: WTC Final 2021 IND vs NZ: New Zealand wins by beating Team India, Find out the prize money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.