रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील पाचवा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. RCB ची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर श्रेयंका पाटील हिने तिचा निर्णय सार्थ ठरवताना आपल्या फिरकीची जादू दाखवून देत कमाल केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB च्या ब्युटीनं एका ओव्हरमध्ये मैफील लुटली, पण...
आरसीबीच्या ब्युटीनं एका ओव्हरमध्ये तिने यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लेनिंग आणि फोबे लिचफिल्ड या घातक बॅटर्संना पॅव्हेलियनचा रस्ता दाखला. या दोन विकेट्स घेत तिने एका ओव्हरमध्ये मैफील लुटली. पण उर्वरित तीन षटकात उर्वरित षटकात तिची चांगलीच धुलाई झाली. ४ षटकाच्या आपल्या कोट्यात तिने अर्धशतक साजरे केले. अर्थात १२.५० च्या सरासरीसह ५० धावा खर्च केल्या. एका ओव्हरमध्ये जादू दाखवून ती अखेरच्या षटकात अधिक धावा खर्च करून या सामन्यात संघाकडून सगळ्यात महागडी गोलंदाज ठरली. एवढेच नाही तर WPL मध्ये ५० धावा खर्च करणाऱ्या फिरकी बॉलर्सच्या यादीत ती संयुक्तरित्या अव्वलस्थानावर पोहचली. एक षटक चांगले टाकून शेवटी तिच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास
बऱ्याच दिवसांनी कमबॅक, विकेट मिळाल्या ही ठरली जमेची बाजू
श्रेयंका पाटील सातत्याने दुखापतीचा सामना करत असल्यामुळे टीम इंडियाबाहेर होती. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत संघात कमबॅकची आस असताना पुन्हा तिला दुखापतीचा फटका बसला अन् तिचं पुनरागमन लांबणीवर पडले. अखेर WPL च्या यंदाच्या हंगामातून RCB च्या संघाकडून ती क्रिकेटच्या मैदानात उतरली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिने ४ षटकात ३२ धावा खर्च करत १ विकेट घेतली होती. यूपी वॉरियर्स विरुद्ध तिने आणखी दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. धुलाई झाली असली तरी बऱ्याच वर्षांनी कमबॅक करताना प्रत्येक सामन्यात विकेट मिळाली ही तिच्यासाठी जमेची बाजू आहे.