WPL 2026 Grace Harris Equals Sophie Devine Record With Most Expensive Over : WPL च्या चौथ्या हंगामातील पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटर ग्रेस हॅरिसनं RCB च्या संघाकडून आक्रमक फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये तिने आपल्या बॅटिंगमधील पॉवर दाखवताना डिआंड्रा डॉटिनची धुलाई केली. सहाव्या षटकात चौकार षटकारांची आतषबाजी करत हॅरिसनं ३२ धावा काढल्या. WPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या बॅटरनं अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे २४ तासांच्या आत या विक्रमाची पुनरावृत्ती झाली. कमालीचा योगायोग हा की, दोघींनीही सहाव्या षटकातच सर्वाधिक धावा केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेस हॅरिसनं केली सोफी डिवाइनची बरोबरी
तुफान फटकेबाजीसह एका षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ग्रेस हॅरिसनं न्यूझीलंडची बॅटर आणि WPL मधील गुजरात जाएंट्सची किलर खेळाडू सोफी डिवाइनच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सोफीनं रविवारी झालेल्या दिल्ली कॅपिल्टस विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज स्नेह राणाच्या एका षटकात ३२ धावा ककाढल्या होत्या.
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
या दोघी ठरल्या WPL मधील महागडे षटक टाकणाऱ्या गोलंदाज
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळणारी भारताची अनुभवी गोलंदाज स्नेह राणा हिने गुजरात जाएंट्स विरुद्ध WPL च्या चौथ्या हंगामातील चौथ्या सामन्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकल्याचे पाहायला मिळाले. गुजरात जाएंट्सच्या डावातील सहाव्या षटकात सोफी डिवाइन विरुद्ध तिने ३२ धावा खर्च केल्या. कमालीचा योगायोग म्हणजे कॅरेबियन अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन हिची धुलाई देखील सहाव्या षटकात झाली. फरक फक्त एवढेच की, हा WPL च्या चौथ्या हंगामातील पाचवा सामना ठरला.