Indonesia’s Gede Priandana Set World Record Becomes First Bowler To Take 5 Wickets In An Over In T20Is : इंडोनेशियाचा वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदना याने आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला आहे. कंबोडियाविरुद्धच्या सामन्यात प्रियंदनाने एका षटकात पाच विकेट्स घेत अविश्वसनीय कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पुरुष किंवा महिला टी-२० सामन्यात एका षटकात पाच विकेट्स घेणारा प्रियंदना हा पहिला गोलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच षटकात वर्ल्ड रेकॉर्ड! अर्धा संघ तंबूत धाडत फिरवला सामना
विशेष म्हणजे, प्रियंदनाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात ही कामगिरी करून दाखवली. इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्यातील सामना त्या क्षणी चुरशीचा होता. कंबोडियाला विजयासाठी शेवटच्या पाच षटकांत ६२ धावांची गरज असताना पाच विकेट्स त्यांच्या हाती होत्या. पण गेडे प्रियंदना याने एका षटकात सामना फिरवला.
गेडे प्रियंदनाची हॅट्रिक
अशा निर्णायक क्षणी इंडोनेशियाच्या कर्णधाराने चेंडू प्रियंदनाकडे सोपवला आणि त्याने कंबोडियाच्या विजयाच्या आशा अक्षरशः उद्ध्वस्त केल्या. प्रियंदनाने पहिल्या तीन चेंडूंवर शाह अबरार हुसैन, निर्मलजीत सिंग आणि चांथिओन रत्नक यांना बाद करत हॅट्रिक पूर्ण केली. यानंतर त्याने एक डॉट बॉल टाकला. पुढील चेंडूवर मोंगदारा सोक याला बाद केले. त्यानंतर एक वाइड चेंडू टाकल्यानंतर, शेवटच्या चेंडूवर पेल वेनाक याला बाद करत इंडोनेशियाला विजय मिळवून दिला. कंबोडियाचा संघ १०७ धावांवर आटोपला अन् इंडोनेशियाने हा सामना ६० धावांनी जिंकला.
एका षटकात पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारतीयाचेही नाव
एकूण टी-२० क्रिकेटचा विचार केला, तर एका षटकात पाच विकेट्स घेणारा गेडे प्रियंदना हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधीअमीन हुसैन आणि अभिमन्यू मिथुन यांनी ही कामगिरी केली होती. अमीन हुसैन याने २०१३-१४ च्या विक्ट्री डे टी-20 कपमध्ये, यूसीबी–बीसीबी इलेव्हनकडून खेळताना अबाहानी लिमिटेडविरुद्ध एका षटकात पाच विकेट्स घेतल्या होत्या.तर अभिमन्यू मिथुन याने २०१९-२० च्या हंगामातील सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटककडून खेळताना हरियाणाविरुद्ध हा पराक्रम करुन दाखवला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १४ वेळा एका षटकात चार विकेट्स घेण्यात आल्या आहेत. मात्र, एका षटकात पाच विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गेडे प्रियंदनाच्या कामगिरीने