सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी

टेनिस सुपरस्टार मारिया शारापोव्हा ( Maria Sharapova) पून्हा एकदा चर्चेत आली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 5, 2021 12:11 PM2021-02-05T12:11:34+5:302021-02-05T12:27:51+5:30

whatsapp join usJoin us
Why Keralities Are Saying Sorry to Maria Sharapova after Sachin Tendulkar’s Tweet | सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी

सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टेनिस सुपरस्टार मारिया शारापोव्हा ( Maria Sharapova) पून्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या फेसबूक पेजवर नेटिझन्सनी सॉरीचे मॅसेज पाठवले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) याच्यामुळे शारापोव्हाची नेटिझन्स माफी मागत आहेत. 

२०१४मध्ये मारियानं सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे विधान केलं होतं. विम्बल्डनचा एक सामना पाहण्यासाठी सचिन आणि माजी महान फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम गेले होते. या सामन्यानंतर काही पत्रकारांनी शारापोव्हाला एक प्रश्न विचारला होता. आजचा सामना पाहायला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आला होता, तू त्याला ओळखतेस का? या प्रश्नावर शारापोव्हाने नाही असे उत्तर दिले होते आणि मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी तिला नको तितकं सुनावलं होतं आणि आता सात वर्षानंतर भारतीयांनी तिची माफी मागितली आहे. कपड्याच्या व्यापाऱ्यानं तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी; ४३ वर्षीय व्यक्तीचं अनोखं पदार्पण


आता माफी मागण्याचं नेमकं कारण काय?
सचिन तेंडुलकरनं बुधवारी एक ट्विट केलं. त्यात त्यानं अप्रत्यक्षपणे शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारची बाजू घेतली. त्यानं ट्विट केलं की,''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा."  तसेच त्यानं आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका


यानंतर काय झालं?  
सचिन तेंडुलकरची ही भूमिका अनेकांना पटली नाही आणि त्यामुळे सचिनवर टीका झाली. त्यापैकी काही कमेंट मारिया शारापोव्हाची माफी मागणारी होती. या बऱ्याच कमेंट मलयाली भाषेतील होत्या. सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखू शकलो नाही. तू बरोबर होतीस. आम्हाला माफ कर, अशा त्या कमेंट्स होत्या. सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

''आम्हाला माफ कर मारिया... खेळाडू म्हणून सचिनला आम्ही ओळखतो, परंतु व्यक्ती म्हणून ओळखू शकलो नाही. तू बरोबर होतीस आणि तुझ्यावर टीका केल्याबद्दल माफी मागतो.''

''ट्रक भरून माफी मागतो, बहीण. तुझी दूरदृष्टी आम्ही ओळखू शकलो नाही आणि आता ती खरी ठरत आहे.'' 

Web Title: Why Keralities Are Saying Sorry to Maria Sharapova after Sachin Tendulkar’s Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.