सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

''भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया,'' असं आवाहन महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar) यानं ट्विट करून केलं. सचिननं बुधवारी केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सचिननं हे ट्विट करून केंद्र सरकारला समर्थन दिल्याच्या भावना उमटत आहेत.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली.

त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यापासून ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या समर्थनात ट्विट केलं आहे. पण, सचिननं केलेलं ट्विटवर समिंश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सचिनच्या #IndiaAgainstPropoganda ट्विटनंतर सोशल मीडियावर माजी कसोटीपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) ट्रेंड होऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय गायिका रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. या सर्वांना उत्तर म्हणून देशातील अनेक सेलिब्रेटिंनी ट्विट केले. सोशल मीडियावर जणू ट्विटरवॉर सुरू झाला आहे.

सचिनच्या या ट्विटनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचा एक जूना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा सचिन तेंडुलकरची कानउघडणी केली होती.

त्यापैकी एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे हे सचिनवर टीका करताना दिसत आहेत. सचिन नेहमी मदत म्हणून स्वतःची जर्सी, बॅट, असंच काही देत असतो. याला मदत कशी म्हणावी, असे ते या व्हिडीओत म्हणत आहेत.

एक किस्सा असा घडला होती की, एका पत्रकारपरिषदेत सचिन म्हणाला होता, की मी आधी भारतीय आहे आणि नंतर महाराष्ट्रीय... मुंबई फक्त मराठी माणसांची आहे का?, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर मुंबई भारतीयांची आहे आहे उत्तर दिले होते. त्याच्या या विधानावर बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती.

शिवसेना मुखपत्र सामनातून बाळासाहेब ठाकरे यांनी सचिनच्या नावं खुलं पत्र लिहिलं होतं, सचिननं क्रिकेट खेळावं आणि राजकारणाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू नकोस. क्रिकेटच्या खेळपट्टीवर कमावलेली प्रतिष्ठा राजकारणाच्या खेळपट्टीवर गमावू नकोस.