Photo: महेंद्रसिंग धोनीकडून लग्नाच्या वाढदिवसाला साक्षीला भारी गिफ्ट!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं लग्नाच्या ११व्या वाढदिवसाला पत्नी साक्षीला भारी गिफ्ट दिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:39 IST2021-07-05T12:34:10+5:302021-07-05T12:39:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
What Sakshi, Wife Of MS Dhoni, Received As Gift On Wedding Anniversary | Photo: महेंद्रसिंग धोनीकडून लग्नाच्या वाढदिवसाला साक्षीला भारी गिफ्ट!

Photo: महेंद्रसिंग धोनीकडून लग्नाच्या वाढदिवसाला साक्षीला भारी गिफ्ट!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं लग्नाच्या ११व्या वाढदिवसाला पत्नी साक्षीला विंटेज कार गिफ्ट केली आहे. ( MS Dhoni presents awesome gift to wife Sakshi on 11th marriage anniversary). साक्षीनं तिच्या इस्टांग्राम स्टोरीवर त्या कारचा फोटो पोस्ट करून माहीचे आभार मानले. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीकडे महागड्या कार्स व बाईक्सचं कलेक्शन आहे. त्याच्या गाड्या व मोटारसायकलींसाठी स्वतंत्र शोरूमच उभं करण्यात आलं आहे.  

Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!

धोनी आणि साक्षी यांनी ४ जुलै २०१० साली लग्न केलं. त्यांना जिवा नावाची मुलगी आहे. साक्षी सोशल मीडियावर सतत पोस्ट टाकत असते. त्यातुलनेत धोनी सोशल मीडियापासून लांबच राहतो. साक्षीच्या इंस्टा पोस्टवरून चाहत्यांना धोनीचे अपडेट्स मिळतात. सध्या धोनी त्याच्या कुटुंबीयांसह शिमला येथे फिरायला गेला आहे आणि सोशल मीडियावर तेथील फोटोही व्हायरल झाले होते.

२०२० मध्ये १५ ऑगस्टला धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना चाहत्यांना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२१चे सामने स्थगित करण्यात आले होते आणि आता उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये यूएईत खेळवण्यात येणार आहेत. त्यासाठी CSKचे फॅन्स खूप उत्सुक आहेत.
 

Web Title: What Sakshi, Wife Of MS Dhoni, Received As Gift On Wedding Anniversary