भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आपला दोन वर्षांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीत दान केला. पूर्व दिल्लीतून लोकसभेत निवडून गेलेल्या गंभीरनं यापूर्वी दिल्ली सरकारला एक कोटींची मदत केली होती. त्यानं आता देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारला आणखी मदत केली. पण, यावेळी त्यानं देशातील लोकांना मार्मीक सवाल विचरला.
त्यानं पोस्ट केली की,''लोकं विचारतात देशानं त्यांच्यासाठी काय केलं. पण, त्यांनी देशासाठी काय केलं, हा खरा प्रश्न आहे. मी माझा दोन वर्षांचा पगार पंतप्रधान केअर फंडात जमा केला आहे. तुम्हीही पुढे येऊन मदत करा.''
तत्पूर्वी, गंभीरने कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या खासदार फंडातून दिल्ली सरकारला ५० लाखांची मदत करणाऱ्या गंभीरने आणखी एक कोटींची मदत जाहीर केली आहे. शिवाय त्याने एक महिन्याचा पगारही दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शनिवारी पंतप्रधान नागरिक सहकार्य आणि आपत्कालीन परिस्थिती निधीत 51 कोटींची मदत जाहीर केली. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही कोरोना व्हारयसशी मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मदतीला पुढाकार घेतला आहे. रहाणेनं महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
रहाणेच्या आधी सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांची मदत केली आहे. यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दान केले आहेत. इरफान व युसूफ पठाण बंधुंनीही 4000 मास्कचे वाटप केले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
World Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...
World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम