बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:24 IST2019-10-23T15:23:37+5:302019-10-23T15:24:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
We will support Virat Kohli in every way to ensure India becomes best team in the world: Sourav Ganguly | बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा कर्णधार विराजमान झाला आहे. गांगुलीच्या नियुक्तीनं भारतीय क्रिकेटला अच्छेदिन येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि दहा महिन्यांच्या कार्यकाळात गांगुलीकडून त्यादृष्टीनं धाडसी निर्णयाची उत्सुकता आहे. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत गांगुलीनं कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठं विधान केले आहे.

भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जे काही करावं लागेल, त्यासाठी कोहलीला संपूर्ण सहकार्य करणार, असे मत गांगुलीनं व्यक्त केलं. तो म्हणाला,'' भारतीय क्रिकेटमधील कोहली हा सर्वात महत्त्वाचा माणूस आहे. त्याच्यासोबत मी चर्चा केली आहे. भारतीय संघाला जगात सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही कोहलीला सर्वतोपरी सहकार्य करू. कोहलीनं वर्ल्ड कप जिंकलेला नाही, हे जरी खरं असलं तरी प्रत्येकवेळी यश मिळतेच असं नाही. भारतीय क्रिकेटची वाटचाल योग्य दिशेनं सुरू राहिल याची आम्ही काळजी घेणार आहोत. यासाठी कोहलीसोबत बसून चर्चा करणार आहोत आणि त्याला काय हवे ते पाहणार आहोत.''

कर्णधार असताना बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीही  आपल्याला काहीच कमी पडू दिले नाही, असं गांगुलीनं सांगितले. असेच नाते महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्यात होते. कोहलीसोबतही तसंच नातं निर्माण करण्याचा निर्धार गांगुलीनं बोलून दाखवला.  


 

Web Title: We will support Virat Kohli in every way to ensure India becomes best team in the world: Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.