विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू; टीम इंडियाच्या कर्णधारानं असा काढला वचपा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा केवढा तापट आहे, हे सर्वांना माहित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:58 PM2020-06-15T15:58:25+5:302020-06-15T15:59:01+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Sledged Me for Talking to His Ex-Girlfriend, Reveals Former England Batsman Nick Compton | विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू; टीम इंडियाच्या कर्णधारानं असा काढला वचपा

विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू; टीम इंडियाच्या कर्णधारानं असा काढला वचपा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा केवढा तापट आहे, हे सर्वांना माहित आहे. पण, त्याच्या गर्लफ्रेंडसोबत प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू बोलला म्हणून तो असा वचपा काढेल, याची कुणी कल्पनाही केली नसावी. इंग्लंडचा माजी फलंदाज निक कॉम्प्टन यांच्यासोबत हा प्रसंग घडला आणि त्यानं हा किस्सा सांगितला. इंग्लंडचा संघ 2012मध्ये भारत दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळची ही घटना आहे. इंग्लंडचा माजी सलामीवर विराटच्या Ex गर्लफ्रेंड सोबत बोलला आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यात विराटनं त्याला टोमणे मारून हैराण केलं.

विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

''मालिका सुरू होण्यापूर्वी सर्व क्रिकेटपटू अमहदाबाद येथे एकत्र आलो होतो. तेव्हा कोहलीच्या Ex गर्लफ्रेंडसोबत मी बोलत होतो. त्यावेळी केव्हीन पीटरसन आणि युवराज सिंगही उपस्थित होते. त्यानंतर विराट प्रचंड वैतागला आणि त्यानंतर मी जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी आलो, तेव्हा विराट मला टोमणे मारत होता. कदाचित तो हे सांगत होता की, ती माझी गर्लफ्रेंड आहे. मला काय सांगायचेय हे तुम्हाला कळले ना?,''असे कॉम्प्टन याने सांगितले.

कॉम्प्टननं 16 कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. तो म्हणाला, त्यावेळी हे सर्व हास्यास्पद वाटत होते आणि आता तो प्रसंग आठवून आताही हसू येतंय.'' चार कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडनं 2-1 अशी जिंकली होती. 1984-85नंतर इंग्लंडचा संघ प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला होता.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर 

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच! 

सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती

'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

 

Web Title: Virat Kohli Sledged Me for Talking to His Ex-Girlfriend, Reveals Former England Batsman Nick Compton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.