Virat Kohli : ट्वेंटी-२०त विराट कोहलीच्या नावावर आहे जगात कोणात्याच कर्णधाराला न जमलेला पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:10 PM2021-09-16T19:10:11+5:302021-09-16T19:11:01+5:30

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, परंतु त्यानं असा एक पराक्रम केला आहे की कोणत्याच कर्णधाराला जमलेला नाही

Virat Kohli is the only captain to win T20 series in South Africa, Australia, England and New Zealand | Virat Kohli : ट्वेंटी-२०त विराट कोहलीच्या नावावर आहे जगात कोणात्याच कर्णधाराला न जमलेला पराक्रम

Virat Kohli : ट्वेंटी-२०त विराट कोहलीच्या नावावर आहे जगात कोणात्याच कर्णधाराला न जमलेला पराक्रम

Next

भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, परंतु त्यानं असा एक पराक्रम केला आहे की कोणत्याच कर्णधाराला जमलेला नाही. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड येथे ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. ( Virat Kohli is the only captain to win T20 series in South Africa, Australia, England and New Zealand) 

रोहित शर्मा कर्णधार बनल्यास तीन खेळाडूंवर येईल संक्रात, नाव जाणून बसेल धक्का


विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २९ ट्वेंटी-२० सामन्यांत विजय मिळवले, तर १४ पराभव झाले. २ सामन्यांचा निकाल लागला नाही. फलंदाजी कर्णधार म्हणून त्यानं ४८.४५ च्या सरासरीनं १५०२ धावा केल्या आहेत. अन्य संघाच्या कर्णधारांमध्ये ( ज्यांनी २५ हून अधिक सामन्यांत नेतृत्व सांभाळले आहेत) विराटपेक्षा फक्त दोनच कर्णधारांची जय-पराजयाची सरासरी ( 64.44) ही अधिक आहे. पण, फलंदाजीची सरासरी ही विराटचीच सर्वोत्तम आहे.

 
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं जिंकलेल्या ट्वेंटी-२० मालिका 
2017 in Sri Lanka
2018 in South Africa
2018 in Ireland
2018 in England
2019 in West Indies
2020 in New Zealand
2020 in Australia
ट्वेंटी-२०त सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार 
42 - Asghar Afghan (52 matches)
41 - MS Dhoni (72 matches)
37 - Eoin Morgan (64 matches)
29 - Sarfaraz Ahmed (37 matches)
27 - Virat Kohli (45 matches)
27 - Daren Sammy (47 matches)

Web Title: Virat Kohli is the only captain to win T20 series in South Africa, Australia, England and New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app