ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 व वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा कुठे फायदा झाला आहे, तर कुठे नुकसात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 02:04 PM2021-03-24T14:04:48+5:302021-03-24T14:49:44+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli moves to number 4 in ICC T20 batsman ranking, Rohit Sharma slip to 3rd spot in ODI Ranking | ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का

ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 व वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा कुठे फायदा झाला आहे, तर कुठे नुकसात. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सर्वाधिक २३१ धावा करून मालिकावीर ठरलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohi) यानं ट्वेंटी-20 फलंदाजांमध्ये सुधारणा करताना चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. याच मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) त्यानं पाचव्या स्थानावर ढकलले. या दोघांव्यतिरिक्त ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये भारताचा अन्य खेळाडू नाही. वडिलांची हॅट, शूज अन् कपडे घेऊन हार्दिक-कृणाल पांड्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले, Photo Viral

इंग्लंडच्या डेवीड मलान ( ८९२), ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच ( ८३०) आणि पाकिस्तानचा बाबर आझम ( ८०१) अव्वल तीन स्थानावर कायम आहेत. विराटच्या खात्यात ७६२, तर राहुलच्या खात्यात ७४३ गुण आहेत. 


ट्वेंटी-20 गोलंदाजांत टॉप टेनमध्ये एकही भारतीय नाही. दक्षिण आफ्रिकेचा तब्रेझ शमसी ( ७३३) अव्वल क्रमांकावर आहे. त्यानं अफगाणिस्तानच्या राशिद खानला ( ७१९) दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन अॅगर ( ७०२), इंग्लंडचा आदिल राशिद ( ६९४) आणि बांगलादेशचा मुजीब उर रहमान ( ६८७) टॉप फाईव्हमध्ये आहेत.

वन डे फलंदाजांमध्ये विराट कोहली ८६८ गुणांसह टॉपवर कायम आहे, परंतु रोहित शर्माची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमनं ( ८३७) त्याला मागे टाकले. रोहितच्या खात्यात ८३६ गुण आहेत.


 

Web Title: Virat Kohli moves to number 4 in ICC T20 batsman ranking, Rohit Sharma slip to 3rd spot in ODI Ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.