विराट कोहलीनं बदललं ट्विटर बायो; भारतीय क्रिकेटपटू, हेच गायब!

भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे आणि त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे.  

By स्वदेश घाणेकर | Published: January 18, 2021 10:16 AM2021-01-18T10:16:12+5:302021-01-18T10:16:41+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli changes Twitter bio after welcoming his newborn with wife Anushka Sharma | विराट कोहलीनं बदललं ट्विटर बायो; भारतीय क्रिकेटपटू, हेच गायब!

विराट कोहलीनं बदललं ट्विटर बायो; भारतीय क्रिकेटपटू, हेच गायब!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांच्या घरी नुकतेच परीनं जन्म घेतला. पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतला. ११ जानेवारीला त्यांना कन्यारत्न झाली. 

विराटनं ट्विट करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली होती. विराटनं ट्विट केलं की,''तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट''


नव्या इनिंगची सुरुवात करणारा विराट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेच. ३२ वर्षीय विराटनं पुन्हा एकदा त्याचा ट्विटर बायो बदलला आणि त्यातून भारतीय क्रिकेटपटू, हेच गायब झाल्यानं सर्व चर्चा करत आहेत.  

विराटनं त्याच्या ट्विटर बायोमध्ये फक्त, A proud husband and father एवढेच ठेवले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले. 

तुला परत मानलं रे ठाकूर; विराट कोहलीनं केलं वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरचे कौतुक

 वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ऑसींचा आत्मविश्वास फाजील ठरवला. या दोघांनी ७व्या विकेटसाठी विक्रमी १२३ धावांची भागीदारी केली. या दोघांचे कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) कौतुक केलं. 

 

Web Title: Virat Kohli changes Twitter bio after welcoming his newborn with wife Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.