Vijay Hazare Trophy 2025 Virat Kohli Slams Fifty Against Gujrat : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत विराट कोहलीनं आणखी एक दमदार खेळी करुन दाखवली. पहिल्या सामन्यात शतकी खेळीसह लक्षवेधी ठरलेला विराट गुजरात विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही तो शतक झळकावेल, असे वाटत होते. पण ७७ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग दुसऱ्या शतकाची त्याची संधी हुकली, पण या खेळीसह त्याने वनडेत सलग सहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावा करत आपल्या बॅटिंगमधील क्लास पुन्हा एकदा दाखवून दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडेपासून ते विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील वनडेत सलग सहाव्या सामन्यात त्याच्या भात्यातून ५० पेक्षा अधिक धावांची खेळी आल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतक हुकले, पण...
३७ वर्षीय खेळाडूने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने फक्त २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अखेर डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल बी जयस्वालच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. उर्विल पटेल याने विकेटमागे चपळाई दाखवत किंग कोहलीच्या खेळीला ब्रेक लावला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांनंतर कमबॅक करताना आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीनं शतक झळकावले होते. गुजरात विरुद्धच्या सामन्यात शतक हुकले. पण पुन्हा एकदा त्याच्या भात्यातून खास फटकेबाजी पाहायला मिळाली.
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
किंग कोहलीची मागील ६ वनडेतील 'विराट' कामगिरी
टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर विराट कोहली फक्त वनडे खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पुन्हा आंतरारष्ट्रीय सामन्यात उतरल्यावर तो फ्लॉप ठरला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तीन वनडे सामन्यातील पहिल्या दोन सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. मोठ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याच्यावर बॅक टू बॅक शून्यावर बाद होण्याची वेळ आली. पण त्यानंतर त्याने धमाकेदार कमबॅक केले. मागील ६ वनडेत त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतक झळकावली आहे.
- विरुद्ध ऑस्ट्रेलिया ७४ (८१)*
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका १३५ (१२०)
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका १०२ (९३)
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६५ (४५)*
- विरुद्ध आंध्र प्रदेश १३१ (१०१)
- विरुद्ध गुजरात ७७ (६१)