IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास

द्विशतकी खेळीसह त्याने यशस्वीचा विक्रम मोडत केली संजूची बरोबरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:28 IST2025-12-24T18:26:37+5:302025-12-24T18:28:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vijay Hazare Trophy 2025-26 Odisha's Swastik Samal Scripts History With Double Hundred Surpassing Yashasvi JaiswalAnd Equals Sanju Samson Record Highest scores in Vijay Hazare Trophy | IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास

IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास

Odisha's Swastik Samal Scripts History With Double Hundred In Vijay Hazare Trophy 2025-26 : ओडिशाच्या स्वस्तिक सामलने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी ऐतिहासिक खेळी साकारली.  बुधवारी, २४ डिसेंबरला अलूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात त्याने १६९ चेंडूत २१२धावांची खेळी केली. या खेळीसह लिस्ट-ए क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ओडिशाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

IPL मध्ये अनसोल्डचा टॅग; त्या पठ्ठ्यानं द्विशतकी खेळीसह यशस्वीचा विक्रम मोडत केली संजूची बरोबरी 

अनकॅप्ड आणि IPL लिलावातील अनसोल्ड स्वत्विक सामल याने सौराष्ट विरुद्धच्या सामन्यात विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील यशस्वी जैस्वालला मागे टाकत टॉप ५ मध्ये एन्ट्री मारली आहे. टीम इंडियाचा युवा बॅटर यशस्वी जैस्वाल याने २०१९ च्या हंगामात मुंबई संघाकडून खेळताना झारखंडविरुद्ध  २०३ धावांची खेळी साकारली होती.  त्याला मागे टाकत सात्विक याने संजू सॅमसनची बरोबरी करण्याचा डाव साधला आहे. IPL २०२६ च्या मिनी लिलावात स्वत्विक सालम याने ३० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. पण त्याला कुणीच भाव दिला नव्हता. 

विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
 
'हार के जितनेवाला बाजीगर' ठरला सामल

२५ वर्षीय बॅटरनं ओडिशाच्या डावाची सुरुवात केली. पण तिघे स्वस्तात बाद झाल्यावर ओडिशा संघाची अवस्था ११.५ षटकानंतर ३ बाद ५९ अशी बिकट झाली. संघ अडचणीत असताना या पठ्ठ्यानं  फक्त डाव सारवला नाही तर विक्रमी द्विशतकासह सामना अविस्मरणीय केला. सामलने कर्णधार बिप्लब सामंतरायसोबत डाव सावरला. या दोघांनी २११ चेंडूत २६१ धावांची भागीदारी रचली. कर्णधाराच्या शतकाशिवाय सालमनं द्विशतकाच्या जोरावर ओडिशाच्या संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३४५ केल्या. सौराष्ट्र संघाने या धावांचा यशस्वी पाठलाग करून मॅच जिंकली. पण सालेमनं द्विशतकासह मैफील लुटली.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च धावा करणारे आघाडीचे फलंदाज

  • एन. जगदीशन- २७७ (१४१ चेंडू), अरुणाचल प्रदेशविरुद्ध, २१ नोव्हेंबर २०२२
  • पृथ्वी शॉ- २२७* (१५२ चेंडू), पुदुच्चेरीविरुद्ध,२५ फेब्रुवारी २०२१
  • ऋतुराज गायकवाड- २२०* (१५९ चेंडू), उत्तर प्रदेशविरुद्ध, २८ नोव्हेंबर २०२२
  • संजू सॅमसन- २१२* (१२९), गोव्याविरुद्ध, १२ ऑक्टोबर २०१९
  • स्वस्तिक सामल- २१२ (१६९ चेंडू), सौराष्ट्राविरुद्ध, २४ डिसेंबर २०२५*

Web Title : आईपीएल में अनसोल्ड, स्वास्तिक सामल ने बनाया रिकॉर्ड दोहरा शतक!

Web Summary : आईपीएल में अनसोल्ड स्वास्तिक सामल ने विजय हजारे ट्रॉफी में सौराष्ट्र के खिलाफ रिकॉर्ड तोड़ दोहरा शतक (212) बनाया। उन्होंने यशस्वी जायसवाल के स्कोर को पीछे छोड़ संजू सैमसन की बराबरी की। उनके प्रयासों के बावजूद, ओडिशा मैच हार गया।

Web Title : Unsold in IPL, Swastik Samal hits record double century!

Web Summary : Swastik Samal, unsold in IPL, smashed a record-breaking double century (212) in the Vijay Hazare Trophy against Saurashtra. He surpassed Yashasvi Jaiswal's score, equaling Sanju Samson's feat. Despite his efforts, Odisha lost the match.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.