Video : When Virat Kohli said talking to Katrina Kaif was his biggest off-field achievement | कॅटरिना कैफशी २ मिनिटांचं बोलणं, ही सर्वात मोठी ऑफ फिल्ड अचिव्हमेंट; विराट कोहलीचा Video Viral

कॅटरिना कैफशी २ मिनिटांचं बोलणं, ही सर्वात मोठी ऑफ फिल्ड अचिव्हमेंट; विराट कोहलीचा Video Viral

विराटच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ( MI) पराभव केला. विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली आणि अनेकांचे विक्रम मोडलेही. त्याच्या प्रत्येक विक्रमाशी तुलना दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाते. २००८मध्ये विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि २०२१मध्ये तो टीम इंडियाचे तीनही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करतोय आणि यशस्वी कर्णधारांच्या पंक्तितही बसला आहे. पण, ऑफ फिल्ड अचिव्हमेंट बाबत विराटनं केलेलं विधान सध्या व्हायरल होत आहे. KKRच्या खेळाडूच्या पत्नीसोबत राशिद खानचा सोशल वॉर; सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर तापले वातावरण!

आक्रमकता, सातत्यपूर्ण कामगिरी आणि सुंदर चेहरा यामुळे विराट नेहमी चर्चेत असतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत विराटला ऑफ फिल्ड अचिव्हमेंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं सांगितलं की, बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ हिच्याशी दोन मिनिटांचं बोलणं ही सर्वात मोठी ऑफ फिल्ड अचिव्हमेंट आहे. वेंकटेश प्रसादला डिवचणं पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरला महागात पडले; 'इंदिरानगरच्या गुंड्यानं' वाभाडे काढले!

पाहा व्हिडीओ... 


२०१७पासून विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आणि आता ते दोघंही पती पत्नी आहेत. इटलीत या दोघांनी लग्न केलं आणि जानेवारी २०२१मध्ये त्यांच्या घरी नन्हीपरीचं आगमन झालं. वामिका असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे.  दुसरीकडे कॅटरिनाचा कोरोना रिपोर्ट नुकताच पॉझिटिव्ह आला असून ती सध्या क्वारंटाईन आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video : When Virat Kohli said talking to Katrina Kaif was his biggest off-field achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.