Virat Kohliचे चाहत्यांना आवाहन; क्रिती सॅनोन, सारा अली खान यांच्यासोबत तयार केला व्हिडीओ

कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:25 PM2020-05-04T16:25:09+5:302020-05-04T16:26:28+5:30

whatsapp join usJoin us
Video : Team India captain Virat Kohli Urges Fans To 'Mat Kar Forward' With Kriti Sanon, Sara Ali Khan svg | Virat Kohliचे चाहत्यांना आवाहन; क्रिती सॅनोन, सारा अली खान यांच्यासोबत तयार केला व्हिडीओ

Virat Kohliचे चाहत्यांना आवाहन; क्रिती सॅनोन, सारा अली खान यांच्यासोबत तयार केला व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी लागली. त्यामुळे बऱ्याच सेलिब्रेटींना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही आहे. पण, कोहली सोशल मीडियावरून चाहत्यांना वारंवार सरकारच्या नियमांचे पालन करा असे आवाहन करत आहे. सोमवारी त्यानं एक व्हिडीओ पोस्ट करून आणखी एक आवाहन केलं आहे. यावेळी त्याच्यासोबत क्रिती सॅनोन, सारा अली खान आणि आयुषमान खुराणा हे बॉलिवूड सेलिब्रेटीही आहेत.

कोरोना व्हायरस संबंधात सध्या फेक व्हिडीओ, मॅसेज सर्रास फॉरवर्ड केले जात आहेत. असे मॅसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन या व्हिडीओतून करण्यात आले आहे. TikTok च्या 'Mat Kar Forward' या मोहीमेसाठी हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ...

दरम्यान, काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले. 44 वर्षीय कर्नल आशुतोष शर्मा 21 राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे कमांडिंग होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर कमांडर मेजर अनुज सूद (30), नायक राजेश कुमार (29), लान्स नायक दिनेश सिंह ( 24) आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक सागीर पठाण उर्फ ​​काझी (41) हे त्याच्यासमवेत होते. त्यांनी घरात प्रवेश करून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले खरे; परंतु ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. या शहीदांना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. तुमचे हे बलिदान विसरता कामा नेय, असे विराटनं ट्विट केलं.
''कोणत्याही परिस्थितित जे आपले कर्तव्य विसरत नाही, ते देशाचे खरे नायक आहेत. त्यांचे हे बलिदान विसरता कामा नये. हंदवाडा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसमोर मी नतमस्तक होतो. जय हिंद,'' असे विराटनं ट्विट केलं.  

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट...

Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...

Virat Kohli पुन्हा मदतीसाठी उभा राहिला, घेतला मोठा निर्णय 

'1999च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासह पाकिस्तानच्या दोन मॅच फिक्स'; वसीम अक्रमवर गंभीर आरोप 

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यानं बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करावी; Shoaib Akhtarची इच्छा

तेव्हा DRS असतं तर भारताच्या 'या' गोलंदाजाच्या नावावर 900 विकेट्स असत्या; गौतम गंभीर

Viral Video : Mohammed Shamiच्या पत्नीचा 'कांटा लगा'वर डान्स; चाहत्यांनी दिला सल्ला... 

Web Title: Video : Team India captain Virat Kohli Urges Fans To 'Mat Kar Forward' With Kriti Sanon, Sara Ali Khan svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.