बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यानं बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करावी; Shoaib Akhtarची इच्छा

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरला बायोपिकचे स्वप्न पडू लागले आहेत. त्यानं त्यासाठी बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं मुख्य भूमिका करावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

शोएबनं रविवारी हॅलो अॅपवरून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांना मनमोकळे उत्तर दिले. त्यानं यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक बनायचे आहे. त्याच्यासारखे जलदगती गोलंदाज भारतात तयार करण्याचे त्याचे स्वप्न आहे, असे सांगितले.

शोएबनं भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे कौतुक केले आणि त्याच्याकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमत आहे, असेही तो म्हणाला.

हरभजन सिंग आणि युवराज सिंग हे जवळचे मित्र असल्याचेही तो म्हणाला. शोएबनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्याबाबतही मत व्यक्त केलं. तो म्हणाला, सचिनपेक्षा राहुल द्रविडला बाद करणं अवघड होतं.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक बनायला आवडेल, असेही त्याने सांगितले.

यावेळी बायोपिकमध्ये कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यानं भूमिका करावी, असा प्रश्न शोएबला विचारण्यात आला. तो म्हणाला,''माझ्या बायोपिकमध्ये सलमान खाननं लीड रोल करावा.''

शोएबनं 224 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात 444 विकेट्स घेतल्या आहेत.