Corona Virus : Virat Kohli पुन्हा मदतीसाठी उभा राहिला, घेतला मोठा निर्णय

जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ही 35 लाख 66,805 इतकी झाली आहे. त्यापैकी 11 लाख 56,982 लोकं बरी झाली आहेत, तर 2 लाख 48, 304 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 42, 533 इतका झाला आहे. त्यापैकी 11,775 लोकं बरी झाली आहेत, परंतु 1391 लोकांना प्राण गमवावे लागले.

कोरोना व्हायसच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री व पत्नी अनुष्का शर्मासह विराटनं पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 3 कोटींची मदत केली आहे. विराट-अनुष्कानं ही रक्कम जाहीर केली नाही.

त्याशिवाय विराटने 2016च्या आयपीएल स्पर्धेतील अविस्मरणीय खेळीची बॅट व ग्लोज आणि जर्सीचा लिलाव करण्याचाही निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे आणि त्यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांत समान वाटला जाईल.

विराट सातत्यानं चाहत्यांना सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचं आवाहन करत आला आहे.

आता विराटनं आणखी एक पुढाकार घेतला आहे. त्याने One8 Commune या ब्रँडसह 30 हजार लोकांना जेवण पुरवण्याचे काम हाती घेतले आहे.

विराटनं इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केली आहे त्यात त्यानं काही कर्मचारी गरजूंसाठी जेवण पॅक करत असल्याचे दिसत आहेत.