आयर्लंडचा फलंदाज केव्हीन ओ'ब्रायन यानं गुरुवारी झालेल्या स्थानिक ट्वेंटी-20 सामन्यांत तुफान फटकेबाजी केली. डुबलीन येथे झालेल्या सामन्यात ओ'ब्रायननं 37 चेंडूंत 3 चौकार व 8 षटकार खेचून 82 धावा चोपल्या. पण, ही फटकेबाजी करताना त्यानं स्वतःच्या गाडीचं नुकसान करून घेतलं. त्यानं टोकावलेला उत्तुंग चेंडू स्टेडियमबाहेर पार्क केलेल्या त्याच्याच गाडीच्या काचेवर आदळला अन् त्याच्या गाडीची काच फुटली.
लेईनस्टर लाइटनिंग विरुद्ध नॉर्थ-वेस्ट वॉरियर्स यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. त्यात लाइटनिंग संघाचे प्रतिनिधित्व ओ'ब्रायननं केलं. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं 12षटकांत 4 बाद 124 धावा केल्या. पावसामुळे षटकांची संख्या कमी करण्यात आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉरियर्सना 12 षटकांत 8 बाद 104 धावा करता आल्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार लाइटनिंगनं हा सामना जिंकला.
पाहा मॅच...
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; खेळाडूंसाठी नियमच बदलला