Video: बेबी, मै क्या हू तेरा? हार्दिक पांड्यानं प्रेयसी नताशाला विचारला सवाल अन्...

हार्दिकनं 2020च्या पहिल्याच दिवशी नताशासोबत दुबईत साखरपुडा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 11:37 IST2020-04-14T11:36:54+5:302020-04-14T11:37:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Baby, who am I for you? Hardik Pandya, girlfriend Natasa Stankovic engage in funny conversation svg | Video: बेबी, मै क्या हू तेरा? हार्दिक पांड्यानं प्रेयसी नताशाला विचारला सवाल अन्...

Video: बेबी, मै क्या हू तेरा? हार्दिक पांड्यानं प्रेयसी नताशाला विचारला सवाल अन्...

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती, परंतु अजूनही त्याबाबतचा निर्णय आलेला नाही. अशात सर्व क्रिकेटपटूंना घरीच रहावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व क्रिकेटपटू कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. हार्दिक पांड्याही प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचसह घरीच वेळ घालवत आहे.

हार्दिकनं 2020च्या पहिल्याच दिवशी नताशासोबत दुबईत साखरपुडा केला. सप्टेंबर 2019 पासून हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतर दुखापतीतून सावरल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतून तो कमबॅक करणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती मालिका रद्द झाली. मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

हार्दिक पांड्यानं नुकताच इंस्टाग्रामवर प्रेयसी नताशासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात हार्दिक नताशाला विचारतो की,''बेबी, मै क्या हू तेरा?''त्यावर नताशा म्हणाली,''जीगर का तुकडा.'' 

पाहा व्हिडीओ...


हार्दिकनं यापूर्वी घरच्या घरी व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट केले होत.  

  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; Corona Virus मुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू जाफर सर्फराजचा मृत्यू

भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

युवराज सिंगला मदत केली, तेव्हा पाकिस्तानातून टीका झाली नाही; शाहिद आफ्रिदीचा भारतीयांना टोमणा

Web Title: Video: Baby, who am I for you? Hardik Pandya, girlfriend Natasa Stankovic engage in funny conversation svg